Beneficial Raw Banana: चांगल्या आरोग्यासाठी पिकलेली केळीच कशाला हवी, कच्चे केळ खाण्याचेही आहेत अनेक फायदे!

सुरकुत्यांपासून सुटका हवी असेल तर कच्ची केळी फायदेशीर आहेत
Beneficial Raw Banana
Beneficial Raw Bananaesakal
Updated on

Beneficial  Raw Banana: केळी हे पोट भरणारं फळ आहे. जे सर्वसामान्यांनाही परवडतं अन् पौष्टीकही असतं. पिकलेली केळी खाणं चांगलं असलं तरी कच्ची केळी खाणं देखील आरोग्यासाठी उत्तम असतं. तुम्ही कच्ची केळी खाण्याच्या उपायाबाबत काही ऐकलंय का. नसेल तर आज आपण याबद्दल जाणून घेऊयात.

कच्ची केळी थेट खाल्ली जात नाही. दक्षिण भारतात कच्च्या केळीपासून चिप्स तयार केले जातात जे लहान मुलेही अगदी चवीने खातात. केळी हे असेच एक अन्न आहे जे जगभरात मोठ्या उत्साहाने खाल्ले जाते आणि प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असते. कच्ची केळी खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

Beneficial Raw Banana
केळ्यापासून तयार करा हे ४ फेसपॅक, Banana Face Pack मुळे चेहऱ्यावर येईल चमक

केळीमध्ये पोषक तत्वे आढळतात

पोषक तत्वांनी युक्त केळीमध्ये फायबर्स आढळतात, जे खराब चरबी पेशी आणि अनेक अशुद्धी साफ करण्यास मदत करतात. पचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यात मदत होते. रोज एक केळ खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

कच्च्या केळ्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, प्रोव्हिटामिन ए, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त आणि फिनोलिक संयुगे यांसारखे अनेक गुणधर्म आढळतात. हे सर्व पोषक तत्व निरोगी शरीरासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. तुम्ही ते उकळून चिमूटभर मीठ टाकून खाऊ शकता. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

Beneficial Raw Banana
Jalgaon Banana Purchase : केळी खरेदीत जादा कटती लावल्यास फौजदारी गुन्हा; पाचोरा बाजार समितीचा निर्णय

कच्ची केळी खाण्याचे ५ मोठे फायदे

पचन चांगले होईल

आजकाल आपल्या शरीरालाही आरबट चरबट खाण्याची सवय लागलीय. त्यामुळे हमखास पचनसंस्थेवर परिणाम होतो. या आजारावर कच्ची केळी गुणकारी आहेत. कच्च्या केळीमध्ये भरपूर फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च असतात. या दोन्हीमुळे पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते तसेच अन्न लवकर पचण्यास मदत होते.  

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेह असलेल्या लोकांसाठी फळे खाण्यावर बरेच नियम असतात. अशा लोकांसाठी कच्चे केळीचे सेवन मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटी-डायबेटिक गुणधर्म देखील मधुमेहाची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.  

हृदयाचे आरोग्य चांगले राहील

आजकाल हृदयविकाराच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. कच्च्या केळ्यामुळे हृदय निरोगी राहते. कच्च्या केळ्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळते, ज्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येते. (Health tips

Beneficial Raw Banana
Banana Crop Damage : रावेरला 2200 हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त; वादळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण

लठ्ठपणापासून मुक्त व्हा

केळी हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. कच्च्या केळ्यामध्ये काही प्रमाणात फायबर आढळते आणि फायबर लवकर पचत नाही. ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे आपल्याला जास्त खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रित ठेवता येते.  

त्वचेसाठी देखील चांगले

वय वाढल्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांपासून सुटका हवी असेल तर कच्ची केळी फायदेशीर आहेत. कच्च्या केळ्यामध्ये अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.