BB And CC Creams : आजकाल तरूणींमध्ये मेकअपची भलतीच क्रेझ निर्माण झाली आहे. मेकअपबद्दल आणि मेकअपमधील नवनवीन प्रॉडक्ट्सबद्दल त्यांना जाणून घ्यायला आवडतं. तसेच, त्या प्रॉडक्टसचा वापर करायला ही त्या मागेपुढे पाहत नाही.
मेकअप प्रॉडक्ट्समध्ये नव्याने दाखल झालेल्या बीबी क्रीम आणि सीसी क्रीमचा वापर अनेक महिला आणि तरूणी करताना आढळून येतात. फेअरनेस क्रीम म्हणून किंवा फाऊंडेशनचा एक लाईट बेस म्हणून या दोन्ही क्रीम्सचा वापर प्रामुख्याने केला जातो.
मात्र, बीबी क्रीम आणि सीसी क्रीममध्ये नेमका काय फरक आहे ? आणि या दोन्ही क्रीम्स चेहऱ्यावर लावण्याचे कोणते फायदे आहेत ? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
बीबी क्रीमचा वापर हा चेहऱ्यावर फाऊंडेशन प्रमाणे केला जातो. बीबी क्रीमच्या वापरामुळे चेहऱ्याला फाऊंडेशनप्रमाणे लूक येतो. यासाठी हेव्ही मेकअपची गरज पडत नाही. प्राईमर, फाऊंडेशन, मॉईश्चरायझर आणि सीरमप्रमाणे बीबी क्रीम काम करते. त्यामुळे, बीबी क्रीमला ‘ऑल इन वन क्रीम’ असे म्हटले जाते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, अशा महिलांनी बीबी क्रीमचा वापर अवश्य करावा.
बीबी क्रीमसारखीच सीसी क्रीम देखील चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे काम करते. सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्शन किंवा कॉम्प्लेक्शन केअर होयं. बीबी क्रीममध्ये जे गुण आहेत तेच गुण सीसी क्रीममध्ये देखील आहेत. ही क्रीम चेहऱ्यावर लावल्यावर त्वचा उजळ दिसू शकते आणि त्वचेला नैसर्गिक लूक मिळतो. ज्यांची त्वचा तेलकट आहे, अशा महिलांनी सीसी क्रीमचा वापर आवर्जून करावा. यामुळे त्यांच्या चेहऱ्याला छान फिनिशिंग मिळू शकते.
१.चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी तुम्ही बीबी क्रीम लावू शकता. यामुळे, तुम्हाला फाऊंडेशन लावण्याची गरज पडणार नाही.
२.बीबी क्रीममध्ये अॅंटीएजिंगचे गुणधर्म असल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
३.जर तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स किंवा काळे डाग असतील तर बीबी क्रीमच्या मदतीने डार्क सर्कल्स आणि काळे डाग लपवू शकता.
४.ज्यांना लाईट मेकअप आवडतो त्यांच्यासाठी बीबी क्रीम हा बेस्ट ऑप्शन आहे.
१.जर चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ असतील तर सीसी क्रीम तुमच्यासाठी उत्तम आहे.
२.ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत, त्यांनी सीसी क्रीमचा वापर केल्यास चांगला फरक दिसू शकतो.
३.स्किन टोनिंगसाठी, चेहऱ्यावरील फेअरनेससाठी सीसी क्रीम बेस्ट ऑप्शन आहे.
४.सीसी क्रीममुळे चेहऱ्याला छान ग्लो येतो. शिवाय, ही क्रीम लावल्यावर हेव्ही मेकअपची गरज ही भासत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.