Summer Hydrating Drinks : उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे तहानही भरपूर लागते. उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी प्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात इतर पॅकबंद पेयांच्या तुलनेत ताक हे स्वस्त, परवडणारं आणि आरोग्यदायी आहे. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
ही पातळी संतुलित ठेवण्यासाठी ताकाचे सेवन करण्यास डॉक्टर सांगतात. त्यात इलेक्ट्रोलाइट्स जसे की पोटॅशियमची उत्तम मात्रा असते. यामुळे शरीरातील द्रव पातळी संतुलित राहते. शरीरातील मज्जातंतूच्या बांधणीसाठी तसेच हाडे आणि त्वचेसाठी प्रोटीनयुक्त ताक फायदेशीर असते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक आवर्जून प्यावे.
ताक प्यायल्याने पचनशक्ती सुधारते.
ताकात आम्लयुक्त गुणधर्म असल्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. नियमित सेवनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारखे पोटाचे अनेक आजार कमी होऊ शकतात.
ताक प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो.
ताक प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
फार चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर ताक प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासही ताक फायदेशीर आहे.
नियमित ताकाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते.
ताक प्यायल्याने उन्हाळ्यात शरीर ठंड राहते.
दोन वाट्या दही घ्या. बारीक कापलेली एक लहान मिरची, कोथिंबीर, एक चिमूट साखर, १ लहान चमचा काळे मिरे पूड आणि चवीसाठी कढीपत्ता दह्यात घालून हे दही मिक्सरमधून काढून घ्या. त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर हे द्रव मिश्रण एका ग्लासमध्ये ओतून उन्हाळ्यात किंवा एरवीही वरून कोथिंबीर घालून तुम्ही याचा मनसोक्त आस्वाद तुम्ही घेऊ शकता.
ताकामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहाते. घरी बनवलेल्या ताकामध्ये घातलेल्या मिठात इलेक्ट्रोलाइट्स असतात. ज्यामुळे शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहाते. तर ताकात घातलेल्या साखरेने उर्जा प्राप्त होते. शिवाय ताकात प्रोबायोटिक तत्व असतात. उत्तम पचकनक्रियेसाठी घरी बनवलेल्या ताकाचे सेवन करावे.
- डॉ. अभिजीत देशमुख, पोटविकार तज्ज्ञ, विवेका मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.