Clove Tea Benefits : महागड्या कॉस्मेटिक्सने नाही तर फक्त एक कप चहा पिऊन त्वचेला बनवा तजेलदार

छान आणि मुलायम त्वचा कोणाला नको असते?
Clove Tea Benefits
Clove Tea Benefits esakal
Updated on

Clove Tea Benefits : छान आणि मुलायम त्वचा कोणाला नको असते? आपल्या चेहऱ्यावरती येणारे पिंपल्स कोणालाही आवडत नाहीत. त्यामुळे सगळेच ते येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक मुली यासाठी वेगवेगळ्या कॉस्मेटिक प्रोडक्टसचा वापर करतात. पण जर हे काम आपल्या घरातले काही पदार्थ करू शकतात, असं तुम्हाला कळलं तर? होय, आपल्या स्वयंपाकघरात असलेले मसाले फक्त जेवण चविष्ट बनवत नाहीत तर आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या कित्येक समस्यांना खूप सुंदर औषध सुद्धा असतात.

Clove Tea Benefits
Somnath Temple : सोमनाथ मंदिरात आहे असा एक रत्न ज्याच्या स्पर्शाने दगड सुद्धा सोन्यात बदलतो

लवंग हा असाच एक खडा मसाला आहे जो प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतोच आणि लवंग ही आपल्या तब्बेतीसाठी खूप चांगली सुद्धा असते, लवंग ही आपले वजन कमी करण्यात मदत करते, त्याचे दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पचन सुधारण्यास मदत करतात आणि इतर आरोग्यविषयक आजारांपासून आराम देतात. जर तुम्ही चहाप्रेमी असाल तर लवंग चहा एक उत्तम पर्याय असू शकतो.

Clove Tea Benefits
Ratan Tata Birthday : ‘कारबद्दल जास्त माहिती नसेल तर व्यवसाय कशाला करायचा; जेव्हा बिल फोर्डनं रतन टाटांना सुनावलं!

बघूयात लवंग चहाची रेसिपी

साहित्य

लवंगा - ३

पाणी - 1 कप

Clove Tea Benefits
Women Health : प्रसूतीपश्चात नैराश्याचे वेळीच निदान न केल्यास होतात गंभीर परिणाम

कृती:

- पातील्यात एक कप पाणी घाला आणि त्यात लवंगा घाला आणि ते चांगले उकळवा.

- 3-4 मिनिटांनी गॅस बंद करा.

- ते कपमध्ये गाळून घ्या.

- जर तुम्हाला गोड चहा आवडत असेल तर त्यात मध घाला

Clove Tea Benefits
Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

लवंग चहाचे फायदे

1) हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी लवंग अत्यंत प्रभावी ठरते. लवंगच्या नियमित सेवनामुळे घसा खवखवणे, जळजळ होणे, खोकला, सर्दी यापासून आराम मिळतो.

2) लवंगात अँटि-ऑक्सिडेंट असतात जे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.

3) वजन कमी करायचे असेल तर लवंगाचा चहा मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो.

4) लवंगाचा चहा नियमित घेतल्यास शरीरातील पचनक्रिया सुधारते

5) शरीर उर्जावान व तंदुरुस्त ठेवण्यासाठी लवंग प्रभावी ठरते.

Clove Tea Benefits
Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने कच्चा पेरूची आरोग्यवर्धक भाजी कशी तयार करायची?

6) दात दुखत असतील, हिरड्यांना सूज येत असेल तर त्यावरही लवंगाचा चहा प्रभावी काम करतो.

7) लवंग चहाने त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

8) लवंगाचा चहा पोटदुखी, ब्लोटींग आणि मळमळ इत्यादींसाठी मदत करतो.

9) जर तुम्ही मुरुम, डाग, तेलकट त्वचा किंवा पिंपल्स यांनी त्रस्त असाल तर लवंग आणि कॅमोमाइल चहाचे नियमित सेवन केल्याने खूप फायदे होतील.

10) लवंगामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म देखील असतात जे त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करू शकते, ज्यामुळे सुरकुत्या, वयाचे डाग आणि डाग कमी होऊ शकतात.

11) लवंगामध्ये व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-के असतात जे बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. हे आपल्या शरीराच तापमान कमी करायला मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.