कोणी सांगतात दिवसभरात किमान तीन-चार लिटर पाणी पिले पाहिजे, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी चांगले असते. यात आयुर्वेद सांगते, की जसे अन्न पचते, तसेच पाणीही आपल्या शरीरात पचत असते. आपणास तहान लागते म्हणजे शरीर पाण्याची मागणी करते, म्हणून तहान लागेल त्याचवेळी पाणी पिले पाहिजे. सर्वात उत्तम पाणी म्हणजे नैसर्गिक आणि मातीच्या भांड्यात साठवले जाणारे पाणी आरोग्यदायी असल्याचे आयुर्वेद सांगते.
माणसाच्या शरीरात ७० ते ८० टक्के पाणी असते. शरीराला पाणी कमी पडले, तर घशाला कोरड पडते. भरपूर पाणी पिण्याचे शरीराला खूप फायदे आहेत. मात्र, काही जण वारंवार लघवीला जावे लागते, असे सांगून पाणी पिणे टाळतात. पाण्यामुळे पोट साफ होते, गॅस होत नाही, वजन कमी होते, अन्नपचन होते. शरीरातील उष्णता कमी होते, मूत्रपिंड साफ होते, मूतखड्याचा त्रास होत नाही असे अनेक फायदे आहेत. अनेक वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे वैद्य सोहन पाठक म्हणाले, की माणसाच्या वात, पित्त आणि कफ अशा आयुर्वेदामध्ये तीन प्रकृती सांगितलेल्या आहेत. प्रत्येक प्रकृतीनुसार आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाणी कमी पडले, तर त्याचा आधी परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्वचा कोरडी पडते आणि निस्तेज होते. पुरेसे पाणी शरीरात असेल
तर त्वचा तजेलदार दिसते. अतिपाणी पिणेदेखील चांगले नसते. जसे अन्न पचते, तसे पाणीदेखील पचत असते. यामुळे तहान लागल्यावरच पाणी प्यावे, एवढे सोपे आयुर्वेदात सांगितले आहे.
पूर्वी घरोघरी तांब्या-पितळाची भांडी होती. आजदेखील ग्रामीण भागात लग्नात वधुपिता तांब्याचा हंडा, तांब्याची घागर किंवा अर्धी तांब्याची आणि आर्धी पितळेची असलेली गंगाजमुनी घागर देतात, तर शहरी भागात आजकाल तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याकडे ओढा वाढला आहे. वैद्य सोहन पाठक म्हणाले, की तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे रक्त शुद्धीकरण होते.
यातील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. मात्र, पित्त प्रकृतीच्या म्हणजे ज्यांना पित्ताचा (अॅसिडिटी) त्रास होणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी जपून प्यावे, कधी तांब्याच्या भांड्यातील, तर कधी इतर भांड्यात साठवलेले पाणी पिले पाहिजे. सर्वात आरोग्यदायी पाणी म्हणजे मातीच्या भांड्यात साठवलेले असते.
पाणी कसे प्यावे?
घटाघटा पाणी पिण्याऐवजी ग्लासाला तोंड लावून पाणी प्यावे.
उभे राहून तोंड न लावता पिऊ नये, कारण थेट पाणी घशात पडते.
उभे राहून वरून पाणी पिले, तर चुकून ते अन्ननलिकेत जाण्याऐवजी
श्वासनलिकेत जाऊ शकते. पाणी पिताना ठसका लागणे, हा तोच प्रकार.
जेवणाच्या मध्यापासून घोट घोट पाणी प्यावे.
जेवण झाल्यानंतर काही जण शेवटी पाणी पितात हे टाळावे.
पडणारे पाणी शरीराचे पोषण करणारे, तर्पण करणारे, शीत गुणाचे व अमृतासारखे असते. ज्यात ऑक्सिजन असते ते ताजे, जिवंत आणि सर्वात पिण्यायोग्य पाणी मानले जाते. मातीच्या भांड्यात असे पाणी असते. मातीच्या भांड्याला न दिसणारी बारीक छिद्रे असतात. त्यातून ऑक्सिजनचा भांड्यातील पाण्याशी संपर्क येतो, म्हणून ते पाणी ताजे मानले जाते.
- वैद्य आनंद कट्टी
निसर्गातील डोंगरदऱ्यांमधून आदळत येणारे वाहते पाणी, झऱ्याचे पाणी हे जिवंत पाणी असते. त्यामुळे पूर्वी नदी, ओढ्याचे किंवा नदी आणि ओढ्यात खोदलेल्या झऱ्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. शहरात येणारे नळाचे पाणीदेखील प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवले जाते.
- डॉ. कैलास आहेर, भूजलाचे अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.