Healthy Food: शिळी चपाती खाण्याचे माहीत नसलेले फायदे वाचाल, तर फेकण्याआधी नक्की विचार कराल!

बहुतांश लोकांचा शिळी चपाती खाल्याने , फूड पॉइजनिंग, एसिडिटी यांसारख्या उद्भवतात असा समज आहे. पण...
benefits of eating stale chapati
benefits of eating stale chapati
Updated on

भारतीय संस्कृतीत चपाती हा पदार्थ आहारात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. रोज चपाती अनेक घरांमध्ये तयार केली जात असल्यामुळे शिळी चपाती असतेच. कधी कधी ती शिळी म्हणून फेकली जाते. बहुतांश लोकांचा शिळी चपाती खाल्याने , फूड पॉइजनिंग, एसिडिटी यांसारख्या उद्भवतात असा समज आहे. परंतु काहीच लोकांना माहिती आहे की, शिळी चपाती खाण्याने काय फायदे होतात.

शिळ्या चपातीत अनेक पोषक तत्वं असतात. शिळी चपाती खाल्ल्यामुळे शरीराला प्रोटिन्स आणि अधिक उर्जा मिळते. तसेच यासोबत मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर रक्तदाब व्यवस्थित राहण्यास मदत होते.

benefits of eating stale chapati
Wedding Fashion : जुनं ते सोनं.! म्हणत सोनाक्षीसह ‘या’ अभिनेत्रींनी स्वत:च्या लग्नात परिधान केल्या होत्या जुन्या साड्या, पाहा फोटो

तर जाणून घ्या शिळी चपाती खाण्याचे फायदे ....

मधुमेहासाठी उपयुक्त

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी शिळ्या चपातीचे सेवन केले तर शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी सकाळी शिळी चपाती दुधात कुस्करून खाल्ल्यास नाष्त्यासाठी एक चांगला पर्याय असेल तसेच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रक्तदाबावर परिणाम

रक्तदाबाचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर त्यावर शिळी चपाती रामबाण उपाय आहे. तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर सकाळी कोमट दुधात शिळी चपाती खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. त्यासाठी दुधात अर्धा तास शिळी चपाती भिजवुन ठेवा. त्यानंतर त्याचे सेवन करा.

benefits of eating stale chapati
Nita Ambani : नीता अंबानींनी भेट दिलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा असा आहे इतिहास, महाराणी अहिल्याबाई यांच्याशी आहे थेट कनेक्शन

पोटांचे विकार दूर होतात

पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर शिळी चपाती गुणकारी आहे. चपातीही गव्हाच्या पिठापासून बनवली जाते यात योग्य प्रमाणात फायबर असते तसेच पचण्यासाठी चांगली अशते. तुम्ही जर बद्कोष्ठता, अॅसिडिटी, पोटात जळजळ आणि पोटाशी संबंधित आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात शिळी चपाती खाल्ल्याने फायदे होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.