रोज रात्री नाभीवर ‘या’ तेलाचे काही थेंब लावा, केसगळतीसह कित्येक समस्यांपासून मिळेल सुटका

Belly Button Oiling Benefits बदामाचे सेवन करण्याव्यतिरिक्त बदामाच्या तेलाचाही नियमित वापर केल्यास आरोग्यास बरेच लाभ मिळू शकतात. यामुळे केसगळतीसह अन्य समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते.
Belly Button Oiling Benefits
Belly Button Oiling BenefitsSakal
Updated on

हल्लीच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे केसगळतीच्या समस्येनं बहुतांश जण हैराण झाले आहेत. यामध्ये केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळींचाही समावेश आहे. अकाली केस पांढरे होणे आणि केसगळती, कोंडा यासारख्या समस्यांचे मूळ आपली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या वाईट सवयी देखील असू शकतात. 

हे नुकसान टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनचर्या व आहारात आवश्यक ते बदल करून या समस्या काही प्रमाणात टाळता येऊ शकतात. तसंच काही रामबाण घरगुती उपायही समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. या लेखाद्वारे आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे त्वचेसह केसांच्या आरोग्यास भरपूर फायदे मिळतील.  

Belly Button Oiling Benefits
त्वचा नितळ व सतेज होण्यासाठी कच्च्या दुधात मिक्स करा या गोष्टी, 7 दिवसांत चेहऱ्यावर येईल चमक

बदामाच्या तेलाचा वापर करण्याचे फायदे 

जर आपण ब्युटी केअर रूटीनमध्ये बदामाच्या तेलाचा समावेश केला तर कित्येक फायदे मिळू शकतात. बदामाच्या तेलामध्ये ओमेगा 3, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यासारख्या पोषकतत्त्वांचा भरपूर साठा आहे. यामुळे आरोग्यासह केसांनाही कित्येक लाभ मिळू शकतात.

बदामाच्या सेवनामुळे मेंदूसह संपूर्ण आरोग्यास फायदे मिळतात, हे आपणास माहितीच असावे. पण आज आपण बदामाच्या तेलाचे लाभ जाणून घेणार आहोत.  केसगळती, कोंडा इत्यादी समस्यांपासून सुटका हवी असल्यास हेअर केअर रूटीनमध्ये बदामाच्या तेलाचा समावेश करावा. 

Belly Button Oiling Benefits
सावधान! घाणेरड्या बेडशीटमुळे होऊ शकतात त्वचेच्या गंभीर समस्या, इतक्या दिवसांनी बदलावं अंथरूण

दररोज रात्री नाभीमध्ये बदामाचे काही थेंब सोडून हलक्या हाताने मसाज केल्यास कित्येक शारीरिक समस्यांपासून मुक्तता होऊ शकते. नाभीवर बदामाचे तेल लावण्याचे फायदे जाणून घेऊया...

Belly Button Oiling Benefits
Jawed Habib Tips लांबसडक, घनदाट व मऊ केस हवेत? ट्राय करून पाहा हेअर एक्सपर्ट जावेद हबीबच्या या 5 टिप्स

नाभीवर बदामाचे तेल लावण्याचे फायदे  ( Benefits of applying almond oil in the navel in Marathi)

  • नाभीवर बदामाचे तेल लावून मसाज केल्यास शरीराच्या पचनप्रक्रियेशी संबंधित कित्येक समस्या दूर होऊ शकतात. 

  • उदाहरणार्थ पोटदुखी, गॅस आणि अपचन यासारख्या त्रासातून सुटका मिळू शकते.

  • त्वचेकरिताही हा उपाय बराच फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. त्वचा मऊ राहते.

  • त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझरचा पुरवठा होतो.   

  • उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.