Benefits of Starfruit: तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेलात तरी तुम्हाला औषधं आणि फळ खाण्याचा सल्ला मिळतो. डॉक्टरांचा विचार पटत असला तरी फळ खाण्याचे अक्षरश: जिवावर येतं. त्यामुळेच लोक फळ खाण्यास टाळाटाळ करतात.
तुम्हाला फळ खाण्याचा कंटाळा येत असेल, नकोसे वाटत असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक लाखमोलाची गोष्ट घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा एका फळाची माहिती देतो ती वाचा आणि हे फळ खायचं की नाही, का खायचं हेही ठरवा.
आज आपण स्टार फ्रूटबद्दल माहिती घेऊयात. आकाशातल्या ताऱ्याला जसे पाच कोन असतात अगदी तसंच हे फळ आहे. म्हणून त्याचे नाव स्टार फ्रूट आहे. चवीला थोड गोड अन् रसदार असलेले हे फळ अनेक पोषक तत्वांनी भरलेलं असतं.
सगळ्याच फळात असतात तसे जीवनसत्व या फळात आहेतच. पण, त्याहूनही जास्त या फळात फायबरचे प्रमाण जास्त असतं आणि कॅलरीज कमी असतात. याच व्हिटॅमिन्स, मिनरल्स, एंटीऑक्सीडंटही जास्त प्रमाणात आहेत.
हे फळ खाण्याचे फायदे काय आहेत ?
स्टार फ्रूटमध्ये भरपूर पोषक असतात, विशेषत: फायबर. याशिवाय यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. हे ग्लुकोज होमिओस्टॅसिसमध्ये योगदान देते. फायबर बद्धकोष्ठता दूर करते आणि चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देऊन पचनसंस्था सुधारते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते
स्टार फ्रूट खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल-कमी होते, याचे कारण या फळात असलेले गुणधर्म होय. कारण, या फळात असलेले फायबरचे उच्च प्रमाण तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. तर, आपल्या शरीरातून फॅट मॉलिक्यूल काढून टाकते. (Cholesterol)
वजन कमी करते
स्टार फळ वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. कारण त्यात कॅलरी कमी आणि फायबर भरपूर आहे. हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे तुमची उर्जा मिळते. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डायटचा विचार करता, तेव्हा या फळाचा नक्की समावेश करा. ज्यामुळे तुमच्या छोट्या भुकेला आराम मिळेल. (Weight Loss)
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
या फळातील फायबर शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबतच स्टार फ्रुटमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि इतर मिनरल्सही भरपूर असतात, ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो. जर तुम्ही रोज या फळाचे सेवन केले तर तुम्हाला तुमच्या औषधांपासून लवकर सुटका मिळेल.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सीसोबत उच्च अँटिऑक्सिडंट्सही असतात. हे संयोजन सुनिश्चित करू शकते की आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि निरोगी राहते. याव्यतिरिक्त, स्टार फळ मॅग्नेशियम, लोह, जस्त, मॅंगनीज, पोटॅशियम आणि फॉस्फरसने समृद्ध आहे.
या फळाचे सेवन कसे करावे?
तुम्ही याचा वापर करून हेल्दी स्मूदी बनवू शकता
उन्हाळ्यात या फळापासून बनवलेला सरबत अतिशय थंड असतो
स्टार फ्रूटचे तुकडे करा आणि त्यात टोमॅटो, कांदा, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळा. हा साल्सा ग्रील्ड चिकन आणि माशांसह अप्रतिम लागतो.
स्टार फ्रूटचा आनंद घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते पूर्णपणे धुवून, त्याचे तुकडे करून ताजे खाणे. तुम्ही ते असंच खाऊ शकता किंवा फ्रूट सॅलडमध्ये घालू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.