Tulsi And Ginger Tea : हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘हा’ हर्बल चहा आहे फायदेशीर

या हर्बल चहाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.
Tulsi And Ginger Tea
Tulsi And Ginger Teaesakal
Updated on

Tulsi And Ginger Tea : हिवाळा सुरू झाला की, अनेक आजारांना सुरूवात होते. सर्दी, खोकला यांसारखे हंगामी आजार बळावण्याची शक्यता या दिवसांमध्ये अधिक दिसून येते. लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांना या समस्या अधिक बळावतात.

ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे किंवा कमजोर आहे, त्यांना हे हंगामी आजार लवकर बळावतात. सर्दी, खोकल्यापासून दूर राहण्यासाठी आपण काही घरगुती उपाय आवर्जून करतो. जेणेकरून या आजारांपासून लवकर आराम मिळू शकेल.

सर्दी, खोकला,घसा खवखवणे आणि ताप सारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुळस-आल्याचा कडक चहा करू शकता. या आयुर्वेदिक चहाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत. या चहामुळे सर्दी-ताप, खोकला आणि घसा खवखवणे सारख्या समस्यांना दूर ठेवले जाऊ शकते.

चला तर मग जाणून घेऊयात तुळस-आल्याचा चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती? आणि या चहाचे कोणते फायदे आहेत? त्याबद्दल ही जाणून घेऊयात.

Tulsi And Ginger Tea
Health Care News: सकाळी नाश्ता न केल्याने वजन कमी होऊ शकते का? तज्ञांचे मत जाणून घ्या

तुळस-आल्याचा चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती ?

हा चहा बनवण्यासाठी कोणत्याही खास साहित्याची गरज भासत नाही. घरातल्याच गोष्टींपासून तुम्ही हा आयुर्वेदिक चहा आरामात बनवू शकता.

हा चहा बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

  • एका चहाच्या भांड्यात किंवा पातेल्यात १ कप पाणी गरम करा.

  • या पाण्याला उकळी येऊ द्या.

  • उकळी आली की, त्यात आले किसून घाला आणि चहापावडर घाला.

  • आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.

  • उकळी आली की, त्यात ५-६ धुतलेली तुळशीची पाने घाला.

  • आता पुन्हा हा चहा चांगल्या प्रकारे उकळू द्या.

  • तुम्हाला हवं असेल तर यात चवीनुसार साखर घालू शकता.

  • ५ मिनिटे चहा पुन्हा उकळू द्या.

  • त्यानंतर, गॅस बंद करून गाळून घ्या आणि गरमागरम प्या.

  • या चहामुळे तुम्हाला सर्दी-खोकला आणि घसा खवखवणे पासून आराम मिळू शकेल.

तुळस-आल्याच्या चहाचे आरोग्याला होणारे फायदे कोणते ?

  • तुळस आणि आलं हे दोन्ही ही नैसर्गिक घटक आहेत.

  • हिवाळ्यात किंवा पावसाळ्यातील आजारांना कारणीभूत असणाऱ्या अनेक जिवाणू आणि जंतूंना नष्ट करण्याचे काम हे दोन्ही घटक करतात.

  • तुळस आणि आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात.

  • शिवाय, या दोन्ही घटकांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात.

  • हे गुणधर्म घशातील जंतूंना नष्ट करण्याचे काम करतात.

  • व्हायरलं फिव्हरमध्ये तर हा हर्बल चहा आवर्जून प्यावा.

Tulsi And Ginger Tea
Benefits Of Lobia : प्रथिनांचे ‘पॉवरहाऊस’ आहे चवळी; जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.