Besan For Skin: चेहऱ्यासाठी महागड्या ट्रिटमेंट करणं परवडत नाही, चिंता सोडा अन् बेसन लावा!

या उपायाने पावसाळ्यात त्वचा आणिखी उजाळेल
Besan For Skin
Besan For Skinesakal
Updated on

Skincare Tips : सध्या पावसाळा सुरु आहे या काळात घरात भजी सर्रास केली जाते. पण भजी करण्यासाठी आवश्यक असणारा पदार्थ म्हणजे बेसन. या बेसनाचे त्वचेसाठी खूप फायदा होतो. जर तुम्ही बेसनाचा नियमित वापर करत असाल तर तुम्हाला फेसवॉशचीही गरज पडणार नाही.

विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. बेसनापासून ढोकळा, बेसनचे लाडू आणि बेसन चिला असे विविध स्वादिष्ट पदार्थ तुम्ही तयार करू शकता. चमचाभर बेसनाच्या मदतीने आपण नितळ त्वचा कशी मिळवू शकतो याची माहिती घेऊया.

बेसनापासून तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ तर बनवू शकताच, पण त्वचेसाठीही याचा वापर करू शकता. बेसनात अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी मिसळून तुम्ही फेसपॅक तयार करू शकता. बेसन फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणेल. (Besan For Skin: If you want to get instant glow then use gram flour for face like this)

Besan For Skin
Face Beauty Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्यांची झालीय गर्दी? या टिप्स येतील कामी!

हा फेसपॅक तुमच्या त्वचेचा टोन सुधारते. यामुळे त्वचा मुलायम होते. पावसाळ्यात चेहरा ओलसर राहील्याने त्वचा जिर्ण होते.

कच्चे दूध आणि बेसन

दोन चमचे बेसनात थोडे कच्चे दूध घालावे. ही पेस्ट मिक्स करून चेहऱ्यावर लावा. आता बेसनाच्या पॅकेटने त्वचेला थोडा वेळ मसाज करा. 10 मिनिटांनंतर हा पॅक चेहऱ्यावरून काढून टाका. हा पॅक तुमची त्वचा स्वच्छ करेल.

बेसन आणि लिंबू

एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. आता बेसन आणि लिंबाची पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १० मिनिटांनी काढून टाका. बेसनाचा हा पॅक टॅनिंग देखील काढून टाकतो. हा पॅक तुमचा रंग वाढवतो. मुरुममुक्त आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा या फेस पॅकचा वापर करू शकता. (Lemon For Face)

Besan For Skin
Coffee Face Mask: Instant Glow हवा असेल तर चेहऱ्याला कॉफी लावण्याचा प्रयोग नक्की करून बघा!

बेसन आणि मध

तुम्ही चेहऱ्यासाठी बेसन आणि मधदेखील वापरू शकता. यासाठी १ ते २ चमचे बेसनात १ चमचा मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी त्वचेला थोडा वेळ मसाज करा. बेसन आणि मधाची पेस्ट १० मिनिटांनी काढून टाका. हा पॅक तुमची त्वचा मऊ ठेवण्याचे काम करेल.

टोमॅटो आणि बेसन

टोमॅटो आणि बेसनपासून फेस पॅक देखील तयार करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेसनात टोमॅटोचा पल्प मिसळावा. टोमॅटो आणि बेसनाची पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर वीस मिनिटे ठेवा. आता साध्या पाण्याने चेहरा धुवा. टोमॅटो आणि बेसन पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता. (Skin Care)

Besan For Skin
Ghee For Face : काळवंडलेल्या चेहऱ्यासाठी क्रिम,पार्लर ट्रिटमेंट करून झालं असेल तर एकदा देशी तूप लावा, फरक पडतो!

बेसनाचे क्लिंझर

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला फेस वॉश करण्याची गरज भासते. त्यामुळे चेहऱ्यावरील तेलावर नियंत्रण मिळवता येते. जर तुम्हाला बेसनाचे क्लिन्झर वापरायचे असेल तर त्यासाठी एक चमचा बेसनमध्ये टोमॅटोची पेस्ट , थोडे गुलाबजल एकत्र करून पेस्ट बनवा.

त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटे असेच राहू द्या. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चेहरा धुतल्यानंतर फरक आपोआप दिसून येईल. (Face Mask)

Besan For Skin
Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर

संवेदनशील त्वचेसाठी उपाय

जर तुमचा चेहरा खूप संवेदनशील असेल. आणि अनेकदा पुरळ, पुरळ आहे. त्यामुळे केमिकलऐवजी बेसन पॅकच वापरा. बेसन क्लिन्झर बनवण्यासाठी एक चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा हळद आणि चंदन पावडर मिसळा.

ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. ते सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर अधिक पुरळ येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()