Whiten Hair Oil : कोणत्याही ट्रिटमेंटपेक्षा पांढरे केस काळे करण्यासाठी या तेलांचा होईल जास्त फायदा, प्रयोग करून पहा 

पांढऱ्या केसांसाठी केमिकलचे रंग वापरून ट्रिटमेंट केली जाते. पण, केसांच्या आरोग्यासाठी हे घातक आहे.
Whiten Hair Oil
Whiten Hair Oilesakal
Updated on

Best Hair Oils For Whiten Hair :

 आजकाल लहानमुलांसह तरूणपणीच केस पांढरे व्हायला सुरूवात झाली आहे. याचा दोष आपण जितका बिघडलेल्या जीवनशैलीला देऊ तितकाच तो आपल्या वाढत्या तणावालाही दिला पाहिजे. कारण, कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केसांची ही समस्या वाढण्याचा वयोगट ही निश्चित नाही. काही लहान मुलांचे तर काही तरूणांनाही याचा सामना करावा लागत आहे.

आजकाल पांढरे केस काळे करण्यासाठी पार्लरमध्ये अनेक ट्रिटमेंट केल्या जातात. जसे केस सुळसुळीत व्हावे म्हणून त्यांना स्ट्रेंटनिंग केलं जातं. तसं, पांढऱ्या केसांसाठी केमिकलचे रंग वापरून ट्रिटमेंट केली जाते. पण, केसांच्या आरोग्यासाठी हे घातक आहे. (Best Hair Oils For Whiten Hair)

Whiten Hair Oil
Adivasi Hair Oil: 'आदिवासी तेल' एवढे प्रसिद्ध का झाले आहे? डॉक्टरांकडून जाणून घ्या जंगली वनस्पती तेलाचे सत्य

केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी इतर पर्याय आपल्या आयुर्वेदात सांगितले आहेत. त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. तुम्हालाही जर केसांना मुळ स्वरूपात आणायचे असेल अन् केसांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या फॉलो करा.  

मोहरीचे तेल वापरा

आपल्या सर्व घरांमध्ये मोहरीचे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पंजाब प्रांतात या तेलाचा खाद्यपदार्थांत मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे आपल्या आरोग्यासाठीही पोषक असते. हे तेल केसांसाठी टॉनिक मानले जाते.

पांढरे केस दूर करण्यासाठी मोहरीचे तेल खूप उपयुक्त ठरू शकते. त्यात मेंदीची पाने मिसळा आणि गरम केल्यानंतर लावा किंवा आवळा-लिंबू मिसळून वापरा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्यानेच परिणाम दिसून येईल.

Whiten Hair Oil
Castor Oil Hair Masks : कोरड्या आणि खराब केसांची समस्या दूर करण्यासाठी एरंडेल तेलाची घ्या मदत, बनवा ‘हे’ हेअरमास्क

नारळाचे तेल (Coconut oil for hair growth)

नारळाच्या तेलात मेंदीची पाने मिक्स करून लावा जर तुम्हाला पांढरे केस काळे करायचे असतील तर खोबरेल तेल हा रामबाण उपाय आहे. त्यात काही मेंदीची पाने टाका आणि थोडा वेळ गरम करा आणि नंतर ती थंड झाल्यावर केसांच्या मुळांपर्यंत नीट लावा. तीन-चार तास असेच राहू द्या आणि नंतर शॅम्पू आणि स्वच्छ पाण्याने केस धुवा. तुम्हाला हवे असल्यास खोबरेल तेलात लिंबू किंवा आवळा मिसळूनही वापरू शकता. यामुळे केस लवकर काळे होऊ शकतात.

बदामाचे तेल (Almond oil for hair)

बदामाच्या तेलात विटामिन ई, बी आणि सी मुबलक प्रमाणात असते, जे केसांसाठी खूप महत्वाचे असते. त्याचा अधिक फायदा मिळवण्यासाठी बदामाच्या तेलात मेंदीची पाने घालून गरम करा आणि थंड झाल्यावर लावा. 3-4 तासांनंतर शैम्पू करा. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्याने पांढरे केस काळे होतात.

 ऑलिव्ह ऑईल (Olive oil for hair)

ऑलिव्ह ऑईलमध्ये नायजेला बियाणे मिसळणे देखील केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात नायजेला बिया मिसळून केसांना लावल्याने पांढरे केस काळे होतात. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा नायजेला बिया घेऊन केसांना लावा आणि 3-4 तासांनंतर केस शॅम्पूने धुवा. रात्री झोपताना लावल्यास सकाळी धुता येते. हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.

Whiten Hair Oil
Oil Combinations For Hairs : केसांच्या समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतील ‘हे’ हेअर ऑईल कॉम्बिनेशन्स

एरंडेल तेल (Castor oil for hair growth)

कॅस्टर ऑइलमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते, जे केसांसाठी आवश्यक असते. यामुळे केसांच्या अनेक समस्या मुळापासून दूर होतात. यासाठी एरंडेल तेल थेट केसांना लावता येते. यामुळे पांढरे केस लवकर सुटू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.