Best Wedding Destinations : 'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार करताय? मध्य प्रदेशातील ही ठिकाणं आहेत बेस्ट

डेस्टिनेशन वेडिंगसाठी मध्य प्रदेशातील ही ठिकाणी आहेत बेस्ट...
Best Wedding Destinations : 'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार करताय? मध्य प्रदेशातील ही ठिकाणं आहेत बेस्ट
Updated on

लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा वेळी अनेक जोडप्यांना त्यांचे लग्न सुंदर ठिकाणी व्हावे,असे वाटते. गेल्या काही वर्षांत डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ खूप वाढली आहे. आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी, जोडपे डेस्टिनेशन वेडिंग म्हणून देशातील वेगवेगळी ठिकाणे निवडत राहतात, परंतु योग्य माहिती न मिळाल्याने कन्फ्युज होतात.

जर तुम्ही मध्य प्रदेशात डेस्टिनेशन वेडिंगसाठी काही सुंदर आणि मनमोहक ठिकाणे शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच काही हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगची प्लॅनचा करू शकता.

Best Wedding Destinations : 'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार करताय? मध्य प्रदेशातील ही ठिकाणं आहेत बेस्ट
Manali Tourism : हॉटेल-रिसॉर्ट सोडा... हनीमूनला रहा बर्फाच्या घरात; मनालीला इग्लूमध्ये राहण्यासाठी किती येईल खर्च?

पचमढी हिल स्टेशन

मध्य प्रदेशातील पचमढी हिल स्टेशन आपल्या सौंदर्यासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या हिल स्टेशनचे सौंदर्य इतके लोकप्रिय आहे की देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.

जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण शोधत असाल तर तुम्ही पचमढी निवडू शकता. अनेक उत्कृष्ट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत जे तुम्ही ठिकाणासाठी निवडू शकता.

पचमढीतील काही वेडिंग व्हेन्यू-

  • एमपीटी चंपक बंगला

  • सातपुडा पर्वत रांग

  • द समर हाऊस

मांडू हिल स्टेशन

मांडू हे मध्य प्रदेशातील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक हिल स्टेशन आहे. टेकडीवर वसलेले मांडू हे मध्य प्रदेशातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. मांडू हे स्थापत्य कलेसाठीही प्रसिद्ध आहे. मांडू हिल स्टेशन हे डेस्टिनेशन वेडिंगसाठीही उत्तम ठिकाण मानले जाते. तुम्ही मांडूलाही तुमचं वेडिंग डेस्टिनेशन बनवू शकता.

मांडूमधील काही वेडिंग व्हेन्यू-

  • जहाज महल

  • राधिका गार्डन

  • उत्सव मॅरेज गार्डन

शिवपुरी हिल

शिवपुरी हिल हा मध्य प्रदेशचा खजिना आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 400 मीटर उंचीवर वसलेले हे राज्याचे सर्वात शांत हिल स्टेशन देखील मानले जाते. क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी अनेक जोडपी येत राहतात.

शिवपुरी हिल हे डेस्टिनेशन वेडिंगसाठीही योग्य ठिकाण मानले जाते. अनेक जोडपी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी शिवपुरीच्या सुंदर खोऱ्यात येतात.

शिवपुरीतील काही वेडिंग व्हेन्यू-

  • राम राजा विवाह घर

  • स्काय लाईन रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट

  • शगुन वाटिका

  • साक्षी मॅरेज गार्डन

ओंकारेश्वर हिल स्टेशन

नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या काठावर वसलेले, ओंकारेश्वर हे एक पवित्र ठिकाण आहे तसेच मध्य प्रदेशातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे.

ओंकारेश्वर हिल स्टेशन हे डेस्टिनेशन वेडिंगसाठीही योग्य ठिकाण मानले जाते. तुम्ही तुमच्या लग्नासाठी हे ठिकाण निवडू शकता.

ओंकारेश्वरमधील वेडिंग व्हेन्यू-

  • हॉटेल उज्ज्वल पॅलेस

  • हॉटेल बृजवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()