Summer Vacations Places : उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या कुटुंबासह भारतातील ‘ही’ सुंदर ठिकाणे करा एक्सप्लोअर

Summer Vacations Places : उन्हाळ्यात खास करून थंड वातावरणाच्या ठिकाणी फिरायला जाण्यावर सगळ्यांचा भर असतो.
Summer Vacations Places
Summer Vacations Placesesakal
Updated on

Summer Vacations Places : मार्च महिना हा असा महिना आहे की, ज्या महिन्यामध्ये देशात उन्हाळ्याला सुरूवात होते. शिवाय, याच महिन्यात मुलांच्या परीक्षा संपतात. त्यामुळे, अनेक जण कुटुंबासोबत बाहेर फिरायला जातात. उन्हाळ्यात खास करून थंड वातावरणाच्या ठिकाणी फिरायला जाण्यावर सगळ्यांचा भर असतो.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्हाला मुलांसोबत बाहेर फिरायला जायचे असेल तर तुम्ही भारतातील काही ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता. भारतात अशी अनेक राज्ये आहेत. ज्या ठिकाणी उन्हाळ्यात आल्हाददायक वातावरण असते. शिवाय, ही ठिकाणे निसर्गसौंदर्याने संपन्न असून येथील वातावरण देखील थंड आहे. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात. (Summer Vacations Places)

Summer Vacations Places
Holi 2024 : यंदा होळी दणक्यात साजरी करायचीय? मग, भारतातील 'या' शहरांमध्ये जायलाच लागतंय

मेघालय

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले आणि कुटुंबासह देशातील पूर्वेकडील राज्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर मेघालय हे राज्य बेस्ट ऑप्शन आहे. मेघालय या राज्यातील चेरापुंजीमुळे येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते.

शिवाय, येथील बागा, नैसर्गिक सौंदर्य, तलाव आणि सुंदर टेकड्या, स्वच्छ नद्या ही ठिकाणे मेघालयाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. चेरापुंजीसोबतच, तुरा, नॉन्गपोह, मावलिनॉन्ग, मावसिनराम इत्यादी ठिकाणांना ही तुम्ही भेट देऊ शकता. (Meghalaya)

कुर्ग

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर तुम्हाला मुलांसोबत आणि कुटुंबासोबत दक्षिण भारतातील काही ठिकाणांना भेट द्यायची असेल तर तुम्ही कुर्गला भेट देऊ शकता. कुर्ग हे कर्नाटक राज्यातील सर्वात सुंदर आणि आल्हाददायक हिलस्टेशन आहे.

भारताचे स्कॉटलंड म्हणून ही या ठिकाणाला खास ओळखले जाते. कुर्गला दरवर्षी देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

कुर्गमधील घनदाट जंगल, निसर्गसौंदर्याने नटलेल्या टेकड्या, कॉफीच्या बागा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे, तुम्ही पर्यटन स्थळांसोबत या ठिकाणांना ही भेट देऊ शकता.

शिवाय, कुर्गमधील वातावरण हे उन्हाळ्यात अतिशय आल्हाददायक असते. ॲबे फॉल्स, होन्नमना केर तलाव आणि विविध वॉटर फॉल्स यांसारखी उत्तम ठिकाणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. उन्हाळ्यात फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. (Coorg)

Summer Vacations Places
Holi 2024 : मथुरा-वृंदावनमध्ये साजऱ्या होणाऱ्या रंगोत्सवात सहभागी व्हायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.