Physical Relation : आनंददायी नात्यासाठी दिवसातील या वेळेत ठेवावेत शारीरिक संबंध

आता संशोधनातून हे देखील समोर आले आहे की, शरीर संबंध ठेवण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे.
Physical Relation
Physical Relationgoogle
Updated on

मुंबई : आपल्याला शरीर सुख उत्तम पद्धतीने मिळावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. परंतु, फक्त ते यातच समाधानी होत नाहीत तर आपल्या जोडीदाराला आपण देणाऱ्या शरीर सुखातून तो तृप्त होतो की नाही याची काळजी देखील विशेष घेतली जाते.

प्रत्येक जोडप्यामध्ये शरीर संबंधाबद्दल नेहमीच उत्सुकता असते. याचे कारण म्हणजे शरीरसंबंधांचा जास्तीत जास्त आनंद घेणे. काही संशोधनातून असे समोर आले आहे की, सकाळच्या वेळी केलेला सेक्स सर्वोत्तम असतो कारण त्या वेळी महिला आणि पुरुषांमधील सेक्स हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची पातळी उच्च पातळीवर राहते.

Physical Relation
Relationship Tips : लैंगिक जीवन आनंददायी करण्यासाठी हे ५ नियम पाळा

मात्र, आता संशोधनातून हे देखील समोर आले आहे की, शरीर संबंध ठेवण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे. हा टाइमझोन जाणून घेतल्याने आपल्या नात्यात अधिक फायदा होईल.

इटलीतील काही संशोधकांना असे आढळून आले की, सकाळी ५.४८ वाजता केलेला सेक्स सर्वोत्तम आहे. हीच वेळ असते जेव्हा बहुतेक लोक कसरत, योगा किंवा फिरायला जाण्याची तयारी करत असतात.

संशोधकांचा असा विश्वास आहे की, यावेळी स्त्री आणि पुरुष दोघांची ऊर्जा पातळी उच्च राहते. याशिवाय ते दिवसभराच्या कामातही भाग घेत नाहीत आणि निवांत असतात. अशा वेळी सेक्स केल्याने जोडप्यांना ऑर्गेज्म मिळण्याची शक्यता जास्त असते.

सर्वोत्तम शरीर संबंध ठेवण्याचे शास्त्र काय ?

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सूर्यप्रकाशामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. हायपोथॅलेमस, हार्मोन निर्मितीसाठी मेंदूतून याला चालना मिळते.

सकाळी डोळे उघडण्याआधीच, पुरुषाची टेस्टोस्टेरॉन पातळी दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेपेक्षा २५ ते ५० टक्के जास्त असते.

Physical Relation
Relationship Tips : वैवाहिक आयुष्यासाठी उत्तम आहेत या ६ लैंगिक स्थिती

लंडनस्थित न्यूरोएंडोक्रिनोलॉजिस्ट अॅशले ग्रॉसमन म्हणतात की यामुळे, पुरुषांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा सकाळी उठल्यावर ताठरता जाणवते. तसेच, टेस्टोस्टेरॉन दिवसभर तयार होत राहते, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.

पल्समधील सर्वोत्तम सेक्सबद्दल नेहमीच उत्सुकता असते. याचे कारण म्हणजे सेक्सचा जास्तीत जास्त आनंद घेणे. काही संशोधनात असे समोर आले आहे की, सकाळच्या वेळेस केलेला सेक्स सर्वोत्तम असतो कारण त्यावेळी सेक्स हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची पातळी महिला आणि पुरुषांच्या उच्च पातळीवर राहते.

सूचना : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()