Bhaubeej 2023 : भाऊबीज का साजरी केली जाते, त्यामागील पौराणिक कथा काय आहे?

भाऊ यम आणि बहिण यमुना यांच्या अतूट नात्याचे बंधन आहे भाऊबीज
Bhaubeej 2023
Bhaubeej 2023esakal
Updated on

Bhaubeej 2023 : आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक नात्याचे महत्त्व सांगणारा एक सण आहे, तर भावा-बहिणीच्या नात्याचा आनंद द्विगुणीत करणारे दोन सण आपल्याकडे साजरे होतात. एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस असलेल्या भाऊबीजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दिवाळीत लक्ष्मीपूजन, दिप पूजन, वसुबारस यांसोबतच दिवाळी पाडवा आणि भाऊबीजही साजरी केली जाते. पण दिवाळीत भाऊबीज का साजरी केली जाते, त्यामागील पौराणिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात.

Bhaubeej 2023
Bhaubeej 2023 : भाऊबिजेसाठी बेस्टच्या जादा बस

भाऊबीजेची पौराणिक कथा काय आहे?

भगवान सूर्यनारायण यांच्या पत्नीचे नाव छाया होते. त्यांच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना यमराजावर खूप प्रेम करायची ती नेहमी यमराजांना आपल्या घरी त्याच्या मित्रांसोबत जेवायला ये असे निमंत्रण देयची. आपल्या कामात व्यस्त असलेले यमराज सतत हा बेत पुढे ढकलत राहिले. कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा दिवस आला आहे. या दिवशी यमुनेने यमराजाला पुन्हा भोजनासाठी बोलावले पण यावेळी आपल्या घरी येण्याचे वचन घेतले.

यमराजाला वाटले की मी जीव हरणारा देव आहे कोणीही मला त्यांच्या घरी बोलावू इच्छित नाही. माझी बहीण ज्या सद्भावनेने मला हाक मारतो आहे आणि तिच्याकडे जाणे हे माझे कर्तव्य आहे. बहिणीच्या घरी येताना यमराजांनी नरकात राहणाऱ्या जीवांना मुक्त केले.

यमराज आपल्या घरी येताना पाहून यमुनेच्या आनंदाला पारावार उरला नाही. आंघोळ करून पूजा करून त्यांना जेवण वाढले त्यांचे आदरतिथ्य केले. यमुनेने केलेल्या पाहुणचाराने प्रसन्न झालेल्या यमराजाने बहिणीला वरदान मागण्याची आज्ञा केली.

Bhaubeej 2023
Bhaubeej 2023 : आज आहे भाऊबीज, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

यमुना म्हणाली की दादा ! तुम्ही दरवर्षी या दिवशी माझ्या घरी याल. आणि माझ्याप्रमाणेच या दिवशी आपल्या भावाशी आदराने वागणाऱ्या बहिणीला तुमच्यापासून कधीही भय नसेल. तुम्ही तिच्या भावाचे नेहमी रक्षण कराल.

यमराजांनी 'तथास्तु' म्हणत अमूल्य वस्त्रे यमुनेला दिली आणि यमलोकासाठी मार्गक्रमण केले.या दिवसापासून उत्सवाची परंपरा सुरू झाली. आदरातिथ्य स्वीकारणाऱ्यांना यमाची भीती वाटत नाही, असे मानले जाते. त्यामुळे भाऊबीजेला यमराज आणि यमुना यांची पूजा केली जाते.

Bhaubeej 2023
Bhaubeej 2023: भावाला औक्षण, टिळा लावताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()