Parenting Tips : मुलं हट्टी झालीत म्हणून त्यांना ओरडू नका, या चूका टाळा, मुलं आपोआप सुधारतील

  Parenting Tips : मुलांना वाढवताना पालक हमखास ही मोठी चूक करतात. अन् मुलं पटकन आत्मसात करतात
Parenting Tips
Parenting Tipsesakal
Updated on

Parenting Tips In Marathi :

एखादा बाळ जन्माला येतं तेव्हा ते केवळ कुटुंबातील सदस्यांच्या हातात असते. बाहेरील अनोळखी लोकांच्या जगात ते आलेलं नसत. त्यामुळे नवजात बालकाची ६ वर्षापर्यंतची शाळा ही त्याचं कुटुंबच असतं.  

लहान मुलं आई-वडिलांच्या, आजी आजोबांच्या सानिध्यात वाढतात. म्हणजेच ते त्यांच्या स्पर्शाने वाढू लागतं. त्याला चालताना, बोलताना, घास भरवताना सतत कुटुंबातील सदस्यांचे स्पर्श होत असतात त्यातून ते धडे घेत असतात.

कुटुंबातील व्यक्ती कसे वागतात हे पाहूनच मुलंही तसे वागण्याचा प्रयत्न करू लागतात. म्हणजेच एखादी गोष्ट कशी करायची, कसे जेवायचे, एखादी सवय कशी लावायची ह्या गोष्टींचे धडे त्याला घरातून मिळतात.

Parenting Tips
Parenting: अवघड परिस्थिती मुलांना कशी समजावून सांगायची?

तुम्ही आजकालच्या मुलांना म्हटलं असेल की आत्ताची मुलं खूप हट्टी आहेत. तर हा त्या मुलांचा गुणधर्म नाहीये. जे मुलं पाहतात तेच ती शिकतात. त्यामुळे मुलांच्या हट्टीपणाला सुद्धा त्यांचे पालकच जबाबदार आहेत. पालकांनी मुलांच्या हट्टीपणाला खत पाणी घातल्याने हा हट्टीपणा प्रचंड वाढत जातो.

पालक जेव्हा मुलांसमोर एखादी गोष्ट करतात तेव्हा ते मुलं सुद्धा ती गोष्ट पुन्हा करायला लागतात. पण हे तेव्हा पालकांच्या लक्षात येत नाही. आणि हीच मोठी चूक ठरते. जेव्हा तुमचं मुलं तुमच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करत असतं तेव्हा त्याला चांगल्या सवयी लावणं हे तुमच्याच हातात असतं. (Parenting Tips In Marathi)

Parenting Tips
Parenting Tips : दोन, अडीच की तीन, लहान मुलांना प्ले ग्रूपला घालण्याचे योग्य वय कोणतं?

एखादं मुलं वाया गेलं तर त्याच्या पालकांना ऐकवलं जातं. ‘या मुलाला जरा सुद्धा वळण नाही’, असं स्पष्ट म्हटलं जातं. तेव्हा पालकांना मात्र वाईट वाटतं. पण तुमच्या मुलाला वाईट बनवण्यातही तुमचाच हात आहे हे लक्षात घ्या. जर तुमच्या मुलाला चांगल्या सवयी लावायच्या असतील तर तुम्ही त्यांच्यासमोर चांगलं वागलं पाहिजे. तसेच त्यांच्यासमोर कोणत्या चूका टाळायला पाहिजेत हे जाणून घेऊयात.

मुलांसमोर भांडण करू नका

काहीवेळा कुटुंबातील कलह हे लहान मुलांसमोरच होत असतात. कधी बाहेरील वाद, भांडण घरापर्यंत येतात आणि ते मुलांच्या नजरेत येतात. जेव्हा तुम्ही रागात भांडत असता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला वाटेल त्या भाषेत आणि वाटेल तसे बोलत असता.

तुमच्या तेव्हा लक्षात येत नाही की तुमची मुलं सुद्धा हे बघत आहेत. तुम्ही जे वागता तुम्ही जे बोलता ते तुमची मुलं सुद्धा बोलतील हे लक्षात घ्या. त्यामुळे भांडण आणि वाद टाळा. मुलं असतील तर भांडणाचे विषय काढू नका. बाहेरून कोणी भांडण्यासाठी आला तर त्याला बाहेरच्या बाहेर पळवून लावा किंवा बाहेर जाऊन वाद मिटवा.

Parenting Tips
Global Day Of Parents 2024 : मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी 'या' गोष्टींकडे द्यावे लक्ष

मुलांसमोर खोटं बोलू नका

नुकताच एक व्हिडिओ पाहण्यात आला होता त्यात एक पालक आपल्या मुलाला सांगतो, ‘अरे माझा फोन वाजतोय, माझ्या मित्राला सांग की मी घरी नाहीये, तेव्हा तो मुलगा त्या फोनवरती सांगतो, ‘पप्पा घरीच आहे त्यांनी सांगितले की ते घरी नाहीये असं सांग. जर तुम्ही नकळत मुलांसमोर खोटं बोलायला लागलात तर ती सुद्धा तुमच्यासमोर खोटं बोलतील. मुलांनी मार्क लपवले, काहीतरी उचापती केल्या आणि तुम्हाला सांगितलं नाही, याचा राग तुम्हाला होत असेल तर लक्षात घ्या की मुलं तुमच्याकडूनच हे खोटं बोलणं शिकले आहेत. त्यामुळे शक्यतो मुलांसमोर खोटं बोलू नका.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, रोज मिळते पनिशमेंट, तर या ट्रिक्स वापरा, मुलं होतील अभ्यासात तरबेज!

सतत मुलांना धाकात ठेवू नका

मुलं हट्टी आहेत आणि ते तुमचं ऐकतच नाहीत म्हणून त्यांना मारून, किंवा शिक्षा करून तुमची गोष्ट मान्य करून घेऊ नका. असे केल्याने मुलांच्या मनात तुमच्याबद्दल भीती बसेल. ते तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगणार नाहीत. जेव्हा तुम्ही मुलांना सांगत असाल की, तो मुलगा बघ त्याच्या वडिलांना सर्व काही विचारून करतो, त्याच्या वडिलांसोबत गप्पा मारतो. पण तू कधीच असं करत नाहीस. तेव्हा तुमचा मुलगा स्पष्टपणे सांगेल की मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र वाईट वाटून घेऊ नका.

Parenting Tips
Parenting Tips: मुल शाळेत जाण्यास नकार देतंय? आधी जाणून घ्या ३ महत्त्वाची कारणे आणि उपाय

मुलांसमोर फोन वापरू नका

फोन वापरणं हे गरज नाही तर व्यसन बनलं आहे, असं कोणीतरी म्हटलं आणि हे खरंच आहे. कारण आपण कामाव्यतिरिक्त असलेला वेळ फोनला देत आहोत. जो वेळ तुमच्या मुलांच्या, कुटुंबाच्या हक्काचा आहे. तो तुमचा मोबाईल घेतोय. मुलांसमोर जर तुम्ही सतत मोबाईल वापरत असाल तर तुमची मुलं सुद्धा सहज मोबाईल वापरायला लागतील. आणि तुम्ही सुद्धा काम करू देत नाहीत म्हणून त्यांच्याकडे मोबाईल द्याल.

ही चूक करू नका. कारण आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होत आहेत. ज्या वयात मुलांनी खेळायला पाहिजे त्या वयात मुलं घरात बसून मोबाईल बघत आहेत खूपच घातक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.