अनेकदा सरकारी शाळांमध्ये घडणारा अनागोंदी कारभार आपल्या ऐकिवात आहे. नजरचुकीमुळे किंवा बेजबाबदारपणे मुलांच्या गुणपत्रिकेत किंवा त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये घोळ झाल्याचं पाहायलादेखील मिळालं आहे. मात्र, बिहारमध्ये एक भन्नाट प्रकार घडला आहे. येथील एका शाळेमध्ये चक्क तीन दिवसाच्या बाळाने इयत्ता ८ वीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
बिहारमध्ये राहणाऱ्या प्रिंस कुमार या विद्यार्थ्याच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवर त्याची जन्म तारीख चुकवल्यामुळे चांगलाच घोळ झाला आहे. प्रिंस कुमार याच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवर त्याची जन्म तारीख २० मार्च २००७ लिहिली असून तो २३ मार्च, २००७ मध्ये आठवीची परिक्षा उत्तीर्ण झाल्याचं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे जन्म झाल्यावर केवळ तीन दिवसातच प्रिंसने आठवीची परिक्षा दिली की काय असं म्हणत अनेकांनी शाळेची खिल्ली उडवली आहे.
"मी मुजफ्फरपूरच्या गोसाईदास तेनगारी सरकारी शाळेतून २३ मार्च,२००७ मध्ये ८वीची परिक्षा उत्तीर्ण झालो होतो. पण, शाळेतील शिक्षकांनी माझ्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवर माझी जन्म तारीख २० मार्च, २००७ लिहिण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या मुख्यध्यापकांनादेखील ही चूक लक्षात आली नाही आणि त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली. या प्रकारानंतर मी शिक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तर मला शाळेतून बाहेर काढण्यात आलं. म्हणून माझ्या वडिलांनी जिल्हा शिक्षाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, शाळेच्या लिपिकाकडून ही चूक झाल्याचं शाळेने मान्य केलं", असं प्रिंसने सांगितलं.
दरम्यान, यापूर्वीदेखील मुजफ्फरपूरच्या भीमराव आंबेडकर विद्यापीठातील एका विद्यार्थ्याच्या एडमिट कार्डवर त्याच्या आई-वडिलांचं नाव चुकवण्यात आलं होतं. यात आईचं नाव सनी लिओनी आणि वडिलांचं नाव इम्रान हाश्मी करण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.