Black Paper Benefits : तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर काळी मिरी खाण्याशिवाय पर्याय नाहीच, का ते जाणून घ्या

अँटिऑक्सिडंट्सची खाण आहे हा मसाला
Black Paper Benefits
Black Paper Benefits esakal
Updated on

Black Paper Benefits : काळी मिरी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपल्या घरातील स्वयंपाकात हमखास वापरला जाणारा हा पदार्थ. आपल्याकडे देवांच्या पूजेतही या मसाल्याला मान आहे. याचे आयुर्वेदात अनेक फायदे आहेत. केवळ भारतातच नाहीतर जगभरात हा पदार्थ वापरला जातो.

काही व्हिडिओमध्ये तर लोक अंडा, ऑमलेट आणि वेगवेगळ्या पदार्थावर फक्त काळी मिरी टाकून खातात. कारण, त्यांना या पदार्थाचे अनेक फायदे माहितीयेत. त्यामुळेच याचे सेवन परदेशात जास्त होते.

केवळ लोक म्हणतात म्हणून नाही.तर, या पदार्थावर संशोधनही केले गेले आहे. हा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे संशोधकांनीही मान्य केले आहे. आरोग्याचा विचार केला तर तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर काळी मिरी खाण्याशिवाय पर्याय नाहीच. मी असं का म्हणतेय हे तुम्हाला हि बातमी वाचून कळेल.

Black Paper Benefits
Walnuts For Health : म्हातारपणी अंग दुखतंय म्हणून विव्हळत बसायचं नसेल तर आत्ताच अक्रोड खायला सुरू करा

अँटिऑक्सिडंट्सची खाण

काळी मिरी शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सची खाण मानली जाऊ शकते. मिरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सचे हानिकारक प्रभाव शरीरात पोहोचण्यापासून रोखतात. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, प्रदूषण, सिगारेटचा धूर आणि सूर्यकिरण यांसारख्या गोष्टींमुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात.

ज्यामुळे शरीरात जळजळ, ऍलर्जी होऊ शकते आणि हृदयरोग आणि कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोका वाढू शकतो. काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन शरीराला या मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते आणि लोकांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

शरीरात वाढणारी सूज रोखतात

काळी मिरी आपल्या शरीरातील वाढती सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेकदा सूज चढते. त्यामुळे संधिवात, हृदयविकार आणि मधुमेह होऊ शकतो. काळ्या मिरीमध्ये असलेले संयुगे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

यामुळे अॅलर्जी, दमा, संधिवात यासह अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे मोसमी ऍलर्जीपासूनही मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

Black Paper Benefits
Lungs Health: 'या' भाज्यांमुळे फुफ्फुस होईल निरोगी, श्वसनाचे आजार होतील दूर

मेंदूसाठी फायदेशीर

काळी मिरी आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर मानली जाते. एनमिलच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की काळी मिरीमध्ये असलेले पाइपरिन मेंदूचे कार्य सुधारते. विशेषत: ज्या लोकांना अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या समस्या आहेत, त्यांना काळी मिरी खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

काळी मिरी स्मरणशक्ती सुधारते. जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची असेल, तर तुम्ही ठराविक मर्यादेत काळी मिरी खाऊ शकता. यामुळे तुमची स्मृती दीर्घकाळ तीक्ष्ण ठेवता येते.

Black Paper Benefits
Liver Health : कायम पायांच्या टाचा दुखतात? तुमच्या यकृतात असू शकते गडबड, ही 5 लक्षणं अजिबात करू नका इग्नोर

रक्तातील साखर नियंत्रित करते

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की काळी मिरीमध्ये असलेले पाइपरिन अँटीऑक्सिडंट रक्तातील साखरेचे चयापचय सुधारू शकते. काळी मिरी खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. दुसर्‍या अभ्यासात, 86 लोकांना 8 दिवसांसाठी पाइपरिन आणि इतर संयुगे असलेली पूरक आहार देण्यात आली.

ज्यामुळे त्यांच्या शरीराची इंसुलिन संवेदनशीलता लक्षणीयरीत्या सुधारली. इंसुलिन संवेदनशीलता सुधारल्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते. तथापि, या संदर्भात अजून संशोधनाची गरज आहे.

कर्करोगाचा धोका कमी होतो

काळी मिरी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. वास्तविक, काळी मिरीमध्ये सक्रिय कंपाऊंड असते, जे कर्करोगाच्या पेशींची प्रतिकृती कमी करू शकते. यामुळे कर्करोग टाळण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय काळ्या मिरीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म देखील असतात. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी काळी मिरी खावी. मात्र, त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Black Paper Benefits
Mental Health: तुमच्या वर्तनाचे मानसिकतेवरही होतात परिणाम?

वजन कमी करते

वजन कमी करण्यासाठी काळी मिरी खाण्याचे फायदे होऊ शकतात. काही आठवडे काळी मिरी असलेले पदार्थांचे सेवन केले तर शरीरातील नको असलेली चरबी वितळते. काळी मिरीच्या सेवनाने शरीराचे वजन थोडे कमी होऊ शकते.

हे सर्व केवळ काळी मिरीमध्ये असलेल्या पाइपरिन आणि अँटीओबेसिटी प्रभावामुळे शक्य आहे. त्यामुळे काळी मिरीमधील औषधी गुणधर्मामुळे वजन कमी होते असे म्हणता येईल. (Health)

धूम्रपान सोडण्यासाठी उपयोगी

ज्यांना धूम्रपान सोडायचे आहे. त्यांच्यासाठी काळी मिरी वापरणे उपयुक्त ठरू शकते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की काळी मिरी पावडरची वाफ घेतल्याने धूम्रपान करण्याची इच्छा हळूहळू नियंत्रित केली जाऊ शकते.

त्वचेसाठी फायदेशीर

काळी मिरी त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, काळी मिरी वापरून बनवलेल्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय, ते चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचेही काम करते. चेहऱ्याला विद्रूप करणारे मुरुम आणि काळे डागही यामुळे कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.