Blackheads Treatment : नाकावरच्या ब्लॅकहेड्समुळे चेहरा खराब दिसतो? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

Blackheads On Nose : आज आम्ही तुम्हाला नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्याचा घरगुती उपाय सांगणार आहोत आणि त्यामुळे त्वचेला कोणते फायदे होतात.
Blackheads
Blackheads sakal
Updated on

त्वचेची काळजी घ्यायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. आणि त्यासाठी आपण रोज नवीन स्किन केअर प्रोडक्ट्सची मदत घेतो. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना ब्लॅकहेड्सचा त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत आणि त्यामुळे त्वचेला कोणते फायदे होतात हे देखील सांगणार आहोत.

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा?

  • काकडी

  • दही

काकडी चेहऱ्यावर लावल्यास काय होते?

  • काकडीत असलेले अँटी-ऑक्सिडंट त्वचेला आर्द्रता देण्यास मदत करतात.

  • यामध्ये असलेले घटक चेहऱ्यावरील छिद्र खोलवर स्वच्छ करतात.

  • काकडीमधील मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट घटक चेहऱ्यावरील छिद्रांचा आकार वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात.

Blackheads
Skin Care Tips : पावसाळ्यात तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ग्रीन टीचा समावेश करा, त्वचा दिसेल चमकदार...

त्वचेवर दही लावल्याने कोणते फायदे होतात?

  • चमकदार त्वचेसाठी दही खूप फायदेशीर आहे.

  • दही त्वचेवर दिसणारे वृद्धत्व कमी करण्यास मदत करते.

  • याचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसते.

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कोणता घरगुती उपाय आहे?

  • सर्व प्रथम एका भांड्यात 2 चमचे दही टाका.

  • यानंतर एक काकडी बारीक करून त्यात टाका.

  • दोन्ही चांगले मिक्स करून नाकावरील ब्लॅकहेड्सवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

  • हे स्क्रबसारखे काम करेल.

  • साधारण 5 मिनिटे नाकावर स्क्रबने मसाज करा.

  • कापूस आणि पाण्याच्या मदतीने ते स्वच्छ करा.

  • तुम्ही हा उपाय आठवड्यातून 3 वेळा वापरून पाहू शकता.

  • हा उपाय सतत करून पाहिल्यास चेहऱ्याचे सौंदर्य द्विगुणित होईल.

  • कोणताही उपाय करण्यापूर्वी, आपण तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एकदा पॅच टेस्ट देखील करा.

अंड्याचा फेस पॅक

अंड्याचा पांढरा भाग पोर्स टाइट करण्यास मदत करते. यात प्रोटीन आणि मिनरल्स असतात. हे बनवण्यासाठी एक अंड्यातील फक्त पांढरा भाग घ्या ते चेहऱ्यावर लावा. याचा एक लेयर वाळल्यानंतर दुसरा लेयर लावा, असे तीन वेळा करा. याला कमीत कमी 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

Chitra kode:

Related Stories

No stories found.