Sunil Shetty : आठ वर्षापूर्वीच्या त्यागामुळे वयाच्या ६२ व्या वर्षीही सुनील शेट्टी आहे इतका फीट

रात्री कितीही उशीरा झोपलो तरीपण सकळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास माझा उठण्याचा प्रयत्न असतो.
Sunil Shetty
Sunil ShettySakal
Updated on

Sunil Shetty Fitness : सुनील शेट्टीने अलीकडेच 'धारावी बँक' या वेबसिरीजद्वारे डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे. या सिरीजमध्ये सुनील शेट्टी धारावीच्या डॉन थलैवाच्या भूमिकेत दिसत आहे.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Sunil Shetty
Deaths In Gym:'जीममध्ये वर्कआऊट केल्यानं मृत्यू होत नाहीत, तर...', सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

या सिरीजमध्ये सुनील शेट्टी वयाच्या ६२ व्या वर्षीही तरुण आणि फिट दिसून येत आहे. दरम्यान वयाची साठी उलटूनही सुनील शेट्टी इतका फीट कसा असा प्रश्न सर्वांना पडतो. काही दिवसांपूर्वी स्वतः सुनील शेट्टीने त्याच्या फिटनेसचं गुपित सांगितलं होते.

Sunil Shetty
LinkedIn: सुनील शेट्टी चक्क 'Linkdin' वर, 'प्रोफाईल' वाचलंय?

काय आहे सुनील शेट्टीच्या फिटनेसचे रहस्य?

फिटनेसबाबत बोलताना सुनील शेट्टी सांगतो की, मी रात्री कितीही उशीरा झोपलो तरीपण सकळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास माझा उठण्याचा प्रयत्न असतो. उठल्यानंतर साधारण एक तास मी न चुकता व्यायाम करतो. शरीर फीट ठेवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही.

सुनीलचा आहार नेमका कसा?

स्वतःला फीट ठेवण्यासाठी मी आहार घेताना मोजकाच घेतो. आहारात मी मीठ, साखर, दूध पांढरा तांदूळ आदी पदार्थ दूर ठेवले आहेत. माझ्या शरीरासाठी काय बरोबर आणि काय चूक हे मला माहीत आहे त्यामुळे मी तशाच पद्धतीचा आहार घेतो.

Sunil Shetty
IPL 2022: केएल राहुलचे शतक अन् आथिया, सुनील शेट्टी जाम खूष; पोस्ट व्हायरल

फिटनेससाठी मी व्यायामासोबतच खेळणे, शेतात बागकाम करतो. लॉकडाऊन दरम्यान माझे वजन खूप वाढले होते. माझे वजन सुमारे ८७ किलो झाले होते. हे कमी करण्यासाठी मी आहारावर लक्ष केंद्रित केले आणि वजनावर नियंत्रण मिळवले. गेल्या आठ वर्षांपासून मी दूध, साखर, मीठ, पांढरा भात आदी पदार्थ खाणे बंद केले आहे. त्यामुळे हेदेखील माझे वयाच्या ६२ व्या वर्षी फीट असल्याचे कारण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()