Best Employee : "बॉसशी जुळवून घेण्यातच शहाणपण", मायक्रोसॉफ्टच्या बड्या अधिकाऱ्याचा सल्ला एकदा वाचाच

जर तुम्ही बॉसशी नीट वागत नसाल तर तुमच्या अडचणींत आणखी वाढ होऊ शकते.
Best Employee
Best Employeeesakal
Updated on

Best Employ : ऑफिसमधील ८-१० तासांत फक्त वर्कलोडच नसून बऱ्याच गोष्टींना प्रत्येक कर्मचाऱ्यास सामोरे जावे लागते. अशात जर तुम्ही बॉसशी नीट वागत नसाल तर तुमच्या अडचणींत आणखी वाढ होऊ शकते.

ऑफिसमध्ये बॉसशी जुळवून घेणे फार महत्वाचे असते. तुमचे बॉसशी पटत नसल्यास तुमचा ऑफिसबरोबरच वयक्तिक आयुष्यातला ताणही वाढू शकतो. म्हणून अनुभवी मानसं म्हणतात ना, "बॉसशी जुळवून घेता आलं पाहिजे". ते अगदी बरोबरच आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीनेसुद्धा हाच सल्ला दिलाय.

मायक्रोसॉफ्टचे वाइस प्रेसिडेंट राहिलेले ख्रिस विल्यम्स यांनी बिझनेस इनसाइडरमध्ये एक लेख लिहिला आहे. ते लीडरशिप अॅडवायजर असण्यासोबतच, तो एक पॉडकास्टर, लेखक आणि टिकटॉकरचे क्रिएटर देखील आहे. या लेखात ख्रिस विल्यम्स लिहितात, “तुम्हाला तुमचा पगार वाढवायचा असेल, बढती मिळवायची असेल किंवा लेऑफ टाळायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला सहयोगीची गरज असते. जो डिसीजन मेकिंग टीमचा एक भाग असेल. तुमचे तुमच्या बॉससोबतचे बाँडिंग चांगले असेल तर तुमचा बॉसच तुमचा उत्तम सहयोगी ठरतो.

मिटींगमधले कठोर निर्णय

ख्रिस लिहितात की, तो अशा असंख्य मिटींग्सचा एक भाग आहे ज्यामध्ये लेऑफ किंवा पदोन्नती संबंधित निर्णय घेतले जातात. कोणत्याही कंपनीकडे पगार वाढवण्यासाठी मर्यादित निधी, पदोन्नतीसाठी मर्यादित जागा आणि दावा करण्यासाठी अनेक लोक असतात. म्हणून निर्णयही काटेकोरपणे घेतले जातात, अशा परिस्थितीत यश मिळवण्यासाठी त्या मिटींगममध्ये आपला समर्थक उपस्थित असणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणतात की कर्मचाऱ्यांबाबतीत जेव्हा चर्चा होते तेव्हा काही निर्णय हे तुमच्या व्यक्तिनिष्ठ आधारावर म्हणजेच तुमचा बॉस तुमच्याबद्दल कसा विचार करतो याआधारावर घेतले जातात. त्यामुळे तुमच्या बॉससोबत तुमचं चांगलं बाँडिंग असणं फार महत्वाचं आहे.

क्रिसच्या मते, जेव्हा एक किंवा दोन स्लॉट असतात आणि उमेदवार जास्त असतात आणि सर्व उमेदवारांमध्ये चुरशीची स्पर्धा असते तेव्हा मदतीची गरज निर्माण होते. मग चर्चा होतात आणि या चर्चेत तुमचा सहकारी तुमच्या बाजून असेल तर तुमच्या करियरसाठी ते फायद्याचं ठरतं.

'तुमचा बॉस हाच तुमचा सर्वोत्तम सहयोगी आहे'

ख्रिस स्पष्टच सांगतात, जेव्हा तुमचा बॉस तुमच्या कामाचं महत्व, तुमचे मूल्य जाणून असतो. अशावेळी तो तुमच्यासाठी पुढच्यांशी लढण्यासही मागे पुढे बघणार नाही. ख्रिस हे देखील स्पष्ट सांगतात की, बॉसला तुमचा मित्र बनवणे म्हणजे फक्त बॉसशी गोड बोलणे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे असे नाही. प्रत्येक वरिष्ठपदी बसणारी व्यक्ती सारखी नसतात. काही बॉस हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुसार आणि प्रामाणिकपणावरून पदोन्नतीवेळी न्याय देतात. (Company)

Best Employee
Asia Richest Person: श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींची घसरण; चीनचा अब्जाधीश दुसऱ्या क्रमांकावर

बॉसशी चांगले बाँडिंग तयार करण्यासाठी ख्रिस यांनी काही टिप्स सांगतिल्या आहेत

क्रिसने काही टिप्स दिल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बॉसला तुमचा समर्थक आणि सहयोगी बनवू शकता.

पहिली ट्रिक म्हणजे तुम्हाला कायम हायलायटेड राहण्याची गरज आहे. तुम्ही प्रामाणिकपणे एका कोपऱ्यात काम करत असाल तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही केलेल्या कामाचा पुरावा तुम्ही वन बाय वन मिटिंगमध्ये देऊ शकता. यामुळे तुम्ही बॉसच्या नजरेतही राहता आणि तुम्ही काय काम करता हे इतरांनाही कळते. काहींना शोऑफ करायला आवडत नाही पण तुमच्या करियरसाठी तुम्हाला हे कधीतरी करावेच लागेल. (Job)

Best Employee
Employment : राज्यातील तब्बल ८८,१०८ उमेदवारांना जानेवारी ते मे अखेरपर्यंत मिळाला रोजगार - मंगल प्रभात लोढा

दुसरी ट्रिक म्हणजे प्रत्येक कामासाठी तुम्ही तत्पर आहात हे बॉसला पटवून द्या. तुमचे काम बघून बॉससुद्धा हैराण होईल. कायम सपोर्टिव्ह बनून रहा. कुठल्याही कठीण परिस्थितीत बॉसला सगळ्यात आधी तुमची आठवण यावी या पद्धतीने तुम्ही काम करायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.