Brain Aging Signs: तुम्हालाही ही लक्षणे जाणवताय? जाणवल्यास तुमचा मेंदू म्हातारा होतोय; वाचा लक्षणे

तुमचा मेंदू म्हातारा होत असल्याची काही महत्वाची लक्षणे जाणून घ्या
Brain Aging Signs
Brain Aging Signsesakal
Updated on

Weak Brain Issues: जसजसे आपले वय वाढते तसतसा आपल्या स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. गोष्टी लक्षात न राहाणे, लवकर गोष्टी विसरणे, मदतीशिवाय काम पूर्ण न होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर ही तुमचा मेंदू म्हातारा होत असल्याची काही महत्वाची लक्षणे आहेत.

जाणून घ्या अशी काही लक्षणे ज्याने तुमचा मेंदू म्हातारा होत चाललाय हे तुमच्या लक्षात येईल.

स्मरणशक्ती कमी होणे

साठी ओलांडल्यानंतर तुमची स्मरणशक्ती कमी होऊ लागते. तुम्ही वस्तू कोणत्या जागी ठेवल्यात हे विसरणे. पासवर्ड विसरणे किंवा काही नावे लक्षात ठेवण्यास त्रास होणे. (Brain Disease)

समजण्यास अडचण

तुमची ब्रेन व्हॅल्यू कमी झाल्याने तुमचा पुढचा लोब आणि हिप्पोकॅम्पस शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त आकसतात. तुम्हाला यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. (health)

Brain Aging Signs
Brain Stroke Day: थंडीच्या दिवसांत ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका; ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

चुकीचे निर्णय घेणे

काही ठरवू न शकणे किंवा चुकीचे निर्णय घेणे ही काही चिन्हे लोकांमध्ये स्मरणशक्ती कमजोर झाल्याचे दर्शवते.

मुड बदलणे

तुमच्या मेंदूवर परिणाम झाला ही तुमच्या भावनिक वागणूकीतही बदल होतो. तुमचे वय जसजसे वाढत जाईल तसतसे तुम्हाला मूड बदलण्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल.

दूरदृष्टी कमजोर होणे

जर तुम्हाला दूरदृष्टीच्या समस्या असतील तर हे वृद्धत्वाचे लक्षण आहे.

चिंता आणि नैराश्य

मेंदू म्हातारा झाल्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. वयानुसार अनेकांमध्ये नैराश्य येणे सामान्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.