Breakup Gainer : ब्रेकअपनंतर तुमचं वजन वाढतंय? सावधान

प्रेमभंग झाल्यावर आलेल्या स्ट्रेसमुळे अनेकजण खूप खाऊ लागतात, त्यातून त्यांच्या मनासह शरीराचं आरोग्यही धोक्यात येतं.
Break up Gainer
Break up Gaineresakal
Updated on

Over Eating After Break up : नातं सुरू होतं तेंव्हा सगळं जग गुलाबी दिसू लागतं. पण मग काही काळाने नात्यात ताण वाढला की ब्रेक अप केला जातो किंवा विचार करण्यासाठी ठरवून ब्रेक घेतला जातो. पण या दोन्हीही प्रक्रियांमध्ये तुमच्यावरचा मानसिक ताण वाढलेला असतो. एकीकडे आवडती व्यक्ती दूरावल्याचं ओझ असतं तर दुसरीकडे एकाकी पडल्याची भावना.

Break up Gainer
Break-up नंतर पश्चात्ताप होत असेल तर काय कराल ?

यात झोप उडते. भूक कमी होते किंवा वाढते. मात्र पूर्वी जो ट्रेण्ड अमेरिकेत मोकळेपणानं बोलला जायचा तो आता आपल्याकडेही दिसतो आहे त्याला म्हणतात ब्रेकअप गेनर किंवा ब्रेकअप पूटऑन. स्ट्रेस इटिंगच्याच कुटुंबातले हे लक्षण की ज्यामुळे आपण आनंदी आहोत असं इतरांना आणि स्वत:ला सांगण्यासाठी अनेकजण खूप खात सुटतात. त्यालाच ब्रेकअप बिंज असंही म्हणतात.

Break up Gainer
Break up झाल्यानंतर या चुका टाळा

अशावेळी प्रेमभंग झाल्यावर आलेल्या स्ट्रेसमुळे अनेकजण खूप खाऊ लागतात, त्यातून त्यांच्या मनासह शरीराचं आरोग्यही धोक्यात येतं. आणि मग विनोदानं म्हणा किंवा दूःखानं मी ब्रेकअप गेनर आहे असं सांगण्याची वेळ येते. त्यासाठी वेळीच सावध व्हा.

Break up Gainer
Break-up करण्यापूर्वी स्वत:ला विचारा हे पाच प्रश्न

जंकफूड खातात. कोल्डड्रिंक पितात. चॉकलेट खातात. चहा-कॉफी पितात. मात्र त्याचा परिणाम वजनवाढीवर आणि मूडवरही होतो.

Break up Gainer
UP Police: ‘पंचवीस चपात्या खाऊन झोप आली’; ट्रेनींगमध्ये डुलकी काढणाऱ्या कॉन्स्टेबलचे स्पष्टीकरण !

काय आहेत साईड इफेक्टस?

  • अनेकांना डोकं जड झाल्यासारखं वाटतं. पचन बिघडतं.

  • पीसीओडी, पाळीचे प्रश्न निर्माण होतात. आणि त्यामुळे पुन्हा वजन वाढतं.

  • काहींना डिप्रेशनही येतं. त्या डिप्रेशनपोटी जास्त खाणंही होतं.

  • असं चक्र सुरुच होतं. त्यातून मग आपण बरे दिसत नाही.

  • लोक चिडवतात. इन्स्टाग्राम डिप्रेशनही वाढतं.

  • प्रेमभंगाशी या समस्यांचा काही संबंध नसतो मात्र तरीही अनेकजण त्यात अडकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.