ब्रेकअपनंतर 'अशी' करा नव्या नात्याची सुरुवात; 'एक्स'सोबतच्या चुका टाळा

जगातील कोणत्याही जोडप्याला त्यांचे नाते तुटावे असे वाटत नाही
Relationship
RelationshipRelationship
Updated on

आजच्या युगात प्रत्येकाला प्रेम होते. कुणाला एकावर तर कुणाला अनेकांवर होते. मात्र, एक खास व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. ज्याच्यासोबतचे नाते कधीही न तुटावे असे वाटत असते. इतकेच काय तर जगातील कोणत्याही जोडप्याला त्यांचे नाते तुटावे असे वाटत नाही. मात्र, काही चुका, गैरसमज, वागणुकीत झालेल्या बदलामुळे अनेकांचे संबंध खराब (Breakup) होतात. अशावेळी केणाचेही आयुष्य संपून जात नाही. जुन्या गोष्टी विसरून नवीन संबंधाला (new relationship) सुरुवात करावी लागते.

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या अनेक प्रयत्नानंतरही लव्ह लाइफवर (Love Life) ब्रेकअपची टांगती तलवार कायम असते. त्याचबरोबर अनेकदा सकारात्मक विचार केल्यानंतरही नाते फार काळ टिकत नाही. जेव्हा असे लोक नवीन नातेसंबंधात येतात तेव्हा त्यांना भीती वाटू लागते की त्यांचे नाते पूर्वीप्रमाणेच तुटून जाईल. अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांनी काही गोष्टी (Important things) लक्षात घ्यावा...

Relationship
‘पहाट’ शपथेचा परिणाम; शिवसेना-काँग्रेस एकाच पंक्तीत

जोडीदारासमोर माजी बद्दल बोलू नका

नवीन संबंधाला सुरुवात करताना माजी प्रेयसी किंवा प्रियकराबद्दल बोलणे टाळावे. एखाद्या जुन्या गोष्टीचा संदर्भ म्हणून तुम्ही एखाद्या घटनेचा उल्लेख करू शकता. परंतु, आनंदाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी भावुक होऊन माजी बद्दल बोलणे किंवा उल्लेख करणे कधीही योग्य राहील.

सोशल मीडियावर अपडेट करू नका

प्रेमात पडल्यानंतर प्रत्येकाला सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करण्याची सवय असते. यातून फोटो सुद्धा टाकले जातात. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट पोस्ट करणे गरजेचे नाही. विशेषतः पार्टनरसोबत आऊटिंग, पार्टी किंवा रोमँटिक फोटो टाकू नका. असे केल्याने गोष्टी बिघडू शकतात.

Relationship
नागपूर : विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ तास दारूची दुकाने बंद

तुलना करणे टाळा

प्रियकर-प्रेयसीचे नातं असो किंवा दुसरं कोणतं नात वाद होतच असतात. नात्यात वाद होणे सामान्य बाब आहे. अशावेळी जुने अनुभव सांगून किंवा तुलना करून जमत नाही. तुमच्या जोडीदाराला असे वाटेल की तुम्ही तुमच्या माजी व्यक्तीशी तुलना करीत आहात.

पूर्व प्रेयसी किंवा प्रियकराच्या आयुष्यात डोकावणे टाळा

एखाद्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचे किंवा त्याचे फोटो बघितले जाते. सोशल मीडियावर प्रोफाईल बघितला जातो. तसेच तुमचा मुद्दा एखाद्याशी शेअर करावासा वाटतो. अशावेळी सोशल मीडियावर तुमची वेदनादायक कथा किंवा कविता लिहू नका. याचा विपरीत परिणाम तुमच्या नवीन नात्यावर पडू शकतो. तुमच्या पूर्व प्रेयसी किंवा प्रियकराच्या आयुष्यात डोकावणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.