Breast Cancer In Men :पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या काय असतात लक्षणं

Breast Cancer Symptoms : गेल्या दोन-तीन वर्षात पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
Breast Cancer In Men
Breast Cancer In Menesakal
Updated on

Breast Cancer In Men :

आज-काल महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. जगातील अधिक स्त्रिया या गंभीर आजाराला बळी पडल्या आहेत. पण आजवर असं वाटत होतं की हा कॅन्सर फक्त महिलांनाच होतो. पण हा कॅन्सर पुरुषांना सुद्धा होऊ शकतो.होय, तुम्ही बरोबर ऐकलंत,   त्याबद्दलच जाणून घेऊयात.

गेल्या दोन-तीन वर्षात पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये एक, 2023 मध्ये दोन आणि 2024 मध्ये तीन पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. महिलांच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी देखील कॅन्सर एक गंभीर आजार आहे.

Breast Cancer In Men
Cancer Prevention Vaccination : कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण केव्हा सुरू होणार?

पुरुषांमध्ये व्यसनांमुळे ट्यूमर होणे, जिभेचा, तोंडाचा, फुफुसांचा कॅन्सर होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. स्तनांमध्ये पेशी अधिक वाढल्याने स्तनांचा कर्करोग होतो. महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही ब्रेस्ट सेल्स वाढतात.

महिलांप्रमाणे पुरुषांच्या स्तनांमध्ये दूध निर्माण करणारे अवयव नसतात. पण त्यांच्यात पेशी, नलिका असतात ज्यामध्ये कॅन्सर निर्माण होऊ शकतो. पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर कधीही होऊ शकतो. त्यासाठी एखादं वय निश्चित नाही. पुरुषांमध्ये 60 ते 70 वय असलेल्या व्यक्तींमध्ये या कॅन्सरचा धोका अधिक आहे.

Breast Cancer In Men
Breast Cancer: 'या' 5 गोष्टी केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका होऊ शकतो कमी

स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे

  • स्तनांमध्ये गाठी निर्माण होणे

  • स्तनाग्रामधून रक्त येणे

  • स्तन फुगीर होणे

  • स्तनाग्रांचा आकार बदलणे

  • स्तनांच्या त्वचेवरती अल्सर निर्माण होणे  

Breast Cancer In Men
Egypt Cancer Treatment : इजिप्तमध्ये ४००० वर्षांपूर्वी व्हायचा कॅन्सरवर उपचार ; संशोधनातून आश्चर्यदायक माहिती आली समोर

पुरुषांना स्तनांचा कर्करोग कशामुळे होतो

  • अल्कोहोलचं सेवन

  • वजन वाढणे

  • शारीरिक हालचाली कमी असणे  

महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांना कॅन्सर झाल्यास त्यांच्यामध्ये स्तन कडक होणे, त्यात गाठी निर्माण होणे,तसेच स्तन सुजू शकतो. स्तनाग्रहांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. तसेच या दुखण्याला सामान्य न समजता लगेचच डॉक्टरांचा  सल्ला घ्यावा.

Breast Cancer In Men
World Lung Cancer Day 2024 : धूम्रपानाचा फॅशन म्हणून वापर; मिळेल कर्करोगाला निमंत्रण

पुरूषांनी या गोष्टी टाळल्या तर कॅन्सरचा धोक कमी होऊ शकतो

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी पुरूषांनी व्यसनांपासून दूर रहायला हवं, अल्कोहोल,तंबाखू, सिगरेट अशा गोष्टींपासून दूर राहील्यास ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर इतर कोणताही कॅन्सर होण्याची जोखिम कमी होते.

तज्ज्ञ सांगतात की, निरोगी राहण्यासाठी तुमची लाईफस्टाइल योग्य असणे गरजेचे आहे. निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार घेणं गरजेचे आहे. सध्या फास्टफुड, अजिनोमोटो सारखा घातक पदार्थ असलेले पदार्थ आपण आवडीने खातो. पण हेच आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()