प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात परफेक्ट ब्राइडल लुक मिळवायचा असतो. सुंदर वधू बनण्यासाठी मेकअप, हेअर स्टाईल, कपडे या सर्वावर भर दिला जातो. पण, तरीही म्हणावा तसा तो लुक परफेक्ट होत नाही. कारण, कोणत्या प्रकारच्या साडीवर कोणती ज्वेलरी आणि कोणती हेअरस्टाईल चांगली दिसेल हे माहिती नसते. त्यामूळे डिझायनर साडीवर भरगच्च दागिने, साऊथ इंडियन साडीवर महाराष्ट्रीयन आंबाडा, असे काहीसे कॉम्बिनेशन केले जाते.
सध्या प्रत्येक मुलीला दक्षिण भारतीय वधूचा गेटअप हवआहे. त्यामुळे मार्केटमध्ये हा लुक ट्रेंडमध्ये आहे. तुम्हालाही तुमच्या लग्नात साऊथ इंडियन लुक करायचा असेल. तर, तो कसा परफेक्ट बनवता येईल हे पाहुयात.
सुरूवात करूया साडीपासून
दक्षिण भारतीय लुक करताना सर्वात महत्त्वाची असते ती तूमची साडी. कारण, साऊथ इंडियन लुक करताना दाक्षिणात्य पद्धतीचा फिल देईल अशीच साडी हवी. त्यामूळे कपडे सिलेक्शन करताना कांजीवरम साडीची निवड करा. सुंदर कांजीवरम सिल्क साडीसह वधूचा मेकअप तुम्हाला परफेक्ट दक्षिण भारतीय वधूचा लुक देऊ शकतो.
दागिने
दक्षिण भारतीय वधूचे दागिने सोन्याचे असतात. ते जड असतात. तुम्हाला असे हेवी दागिने घ्यायचे नसतील तर साऊथ इंडियन स्टाईलची इमिटेशन ज्वेलरी तूम्ही घालू शकता. यात गळ्यात मोठा हार, चोकर नेकलेस, बिंदी, कमरपट्टा, पैजन, वेणी, असे दागिने निवडा.
डोळ्यांचा मेकअप
दक्षिण भारतीय तरूणींचे डोळे टपोरे असतात. तसे तूमचे डोळे नसतील. तर,डोळ्यांवर डार्क मेकअपने ते तूम्ही उठावदार बनवू शकता. तसेच, ओठांनाही डार्क लिपस्टीक आणि व्यवस्थित शेप देऊन ते ही आकर्षक बनवू शकता.
फुलांनी सजवा केस
दक्षिण भारतीय वधूचा लुक फुलांच्या गजऱ्याशिवाय अपूर्ण आहे. फुलांच्या माळा घातलेली वेणी किंवा जुडा ही दक्षिण भारतीय वधूची खासियत आहे. त्यामुळे हेअरस्टाईलला परफेक्ट साऊथ इंडियन लुक देण्यासाठी फुलांची आकर्षक सजावट करायाला विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.