Budget 2024 Memes: अर्थमंत्र्यांकडून बिहार-आंध्रला स्पेशल पॅकेज जाहीर, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

Budget 2024 Memes: अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामुळे सोशल मीडियावर मीम्सची वर्षाव सुरू झाला आहे.
Budget 2024 Memes:
Budget 2024 Memes:Sakal
Updated on

Budget 2024 Memes: अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कृषी, विज्ञान,आरोग्य, नोकरी, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामुळे सोशल मीडियावर मीम्सची झुंबड उडाली आहे.

सोशल प्लॅटफॉर्म एक्सवर मजेदार मीम्स शेअर करण्यात आले आहे. वरच्या मीममध्ये बॉलिवूडचे पात्र दाखवण्यात आले आहे.

जेम्स यांनी एक्सवर बिहार आणि आंध्रावर मजेदार मीम शेअर केले आहे. यावर अनेक युजर्संनी लाइक आणि कमेंटचा वर्षावर केला आहे.

तेजस यांनी टॉम अँड जेरीचे कार्टून शेअर केले आहे. त्यात त्याने बिफोर आणि आफ्टर फोटो दाखवले आहे. हे मीम पाहून अनेकांना हसू अनावर झाले आहे.

एक्सवर सुमित मिश्रा यांनी 'अब हमको चाहिए फुल इज्जत' असे लिहून मीम शेअर केले आहे.

या मीममध्ये तीन लोकांसमोर पैशांचा ढिग दाखवला आहे. कारण बिहार आणि आंध्र-प्रदेशला पायाभुत सुविधांसाठी भरपुर निधी मिळाला आहे.

हे वरील दोन मीम्स पाहून अनेकांना हसू अनावर झाल आहे.

या मीममध्ये संजय दत्तच्या फोटोवर 'ये साला टॉप करणे कग आदत हो गयी है अपुन को' असे लिहिले आहे. या मीमवर ५० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे आणि कमेंटचा वर्षाव झाला आहे.

दरम्यान सरकराने बिहारला रस्त्याच्या कामांसाठी २६ हजार कोटी रूपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच बिहारमध्ये मेडिकल कॉलेज उभारणार आहे. गंगानदीवर दोन नवे पुल बांधणार आहे.तर आंध्र प्रदेशाला ५० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com