Business Tips : नारायण मुर्तींचा बेस्ट बिझनेस फॉर्म्युला, ऐकाल तर स्टार्टअप कधीच फेल जाणार नाही!

स्टार्टअप कंपन्यांनी नेहमी शेअरहोल्डर्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे,कारण
Business Tips
Business Tipsesakal
Updated on

Business Tips : आजकाल देशात स्टार्टअप बिझनेसचा ट्रेंड आहे. तरूण मुलं कशाचाही बिझनेस करत आहेत. नव्याने उभारणाऱ्या कंपन्यांमध्ये जॉब मिळाला तरी तो किती टिकतो अन् पॅकेज किती आहे याची खात्री नसते. त्यामुळे तशी नोकरी स्विकारण्यापेक्षा काहीतरी नवा व्यवसाय केलेला कधीही चांगला ठरेल.  

स्टार्टअप काही केवळ फुडचा नसतो. तो कोणत्याही वस्तूचा असू शकतो. सध्या देशात स्टार्टअप्स तेजीत आहेत. पेटीएम आणि झोमॅटो सारख्या कंपन्यांनीही त्यांचे आयपीओ बाजारात आणले. हे लक्षात घेऊन इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरुण उद्योजकांना काही गोष्टी अंगीकारण्यास सांगितले.

ज्यामुळे तरूणांचा कल बिझनेसकडे वाढेल. बिझनेसमध्ये थोडफार अपयश आलं की लगेचच तरूण दुसऱ्या गोष्टींचा विचार करतात. काही लोक नैराश्यग्रस्त होतात. अशांसाठीच बिझनेस आयडॉल असलेले नारायण मूर्ती यांनी काही आयडिया आजच्या तरूणांना दिल्या आहेत. त्या  

Business Tips
Narayana Murthy Donations: नारायण मूर्ती-सुधा मुर्तींनी तिरुपती मंदिराला दान केली २ किलो सोन्याची मूर्ती, किंमत ऐकून व्हालं थक्क...

कमी किमतीत जास्त पुरवठा करा

एका कार्यक्रमात नारायण मूर्ती म्हणाले की, स्टार्टअप कंपन्यांनी नेहमी त्यांच्या शेअरहोल्डर्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भागधारकांना कमी किमतीत जास्त पुरवठा केला पाहिजे. याचे दोन फायदे आहेत, एक म्हणजे तुमचे शेअर होल्डर तुमच्या वाईट काळात मदत करतात. दुसरे म्हणजे, लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढतो.

तुमचं व्हिजन स्पष्ट ठेवा

नारायण मूर्ती म्हणतात की,मी दरवर्षी शेकडो तरूणांना भेटतो. ज्यांनी देश-विदेशातील अनेक टॉप युनिर्व्हसिटीतून शिक्षण घेतलेलं असतं. अशी मुलं त्यांच्या व्हिजन बाबत सांगताना गोंधळतात. तरूणांची आयडिया, बिझनेस चांगला असतो पण व्हिजन क्लिअर नसते. त्यामुळे गोंधळ उडतो.

अशा गोंधळामुळे तरूणांना म्हणावा तसा आर्थिक सपोर्ट मिळत नाही. त्यामुळे तरूणांनी व्हिजन क्लिअर करावं आणि मग काम सुरू करावं. तसेच, एका वाक्यात व्हिजन सांगता यावं इतकं त्याला सोप्पा करावं.    

Business Tips
Narayana Murthy: इतरांना 70 तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वतः किती तास काम करायचे?

‘तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करा'

यासोबतच नारायण मूर्ती म्हणाले की, नवीन व्यावसायिकाने आपले उत्पादन किंवा सेवा बाजारातील इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी कशी आहे हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, कारण शेवटी कुठेतरी तुम्ही सक्षम व्हाल. बाजारात काहीतरी तयार करण्यासाठी. ते कदाचित फक्त स्पर्धा म्हणून बिझनेस करत असतील. म्हणजे तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे वेगळेपण जपावे लागेल. (Business Tips)

Business Tips
Narayan Murthy : नारायण मूर्तींच्या ७० तासांच्या विधानामुळे वाद ! सर्वाधिक काम कोणत्या देशात केले जाते? जाणून घ्या

स्वत:चे उदाहरण बनवा

जेव्हा एखादा उद्योजक कंपनी सुरू करतो तेव्हा त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत कंपनीवरील लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि तुमच्या कर्मचार्‍यांनी तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी.  तुम्हाला स्वतःला अनेक उदाहरणे घालून द्यावी लागतील, विशेषत: फालतू खर्चावर नियंत्रण आणि शिस्तीच्या बाबतीत. यामुळे त्यांना असे वाटेल की जर ते तुमच्यासाठी योग्य असेल तर ते त्यांच्यासाठीही योग्य असेल.

वेळेला महत्त्व द्या

नारायण मूर्ती म्हणाले की मी एखाद्या कंपनीचा वार्षिक अहवाल न वाचताही त्याचे भविष्य कसे असेल ते सांगू शकतो. जर एखाद्या कंपनीला वेळेची किंमत नसेल तर ती कंपनी कधीच वाढू शकत नाही. त्यामुळे लोकांनी त्यांच्या कार्यसंस्कृतीकडे आणि कामाच्या उत्पादकतेकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.