Milk And Calcium: तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शियमची गरज दूध पूर्ण करत का?

हाडांसाठी सर्वात महत्वाचे पोषक घटक म्हणजे कॅल्शियम. हे खनिज अनेक गोष्टींमध्ये आढळते, पण दुधात त्याचे प्रमाण
Milk And Calcium
Milk And Calciumesakal
Updated on

Milk And Calcium: आपण आपल्या डायटच्या बाबतीत जरा काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या वाढणारे आजार, बदललेली जीवनशैली, फास्ट फूड खाण्याच वाढतं प्रमाण या सगळ्यात शरीर कधी मागे सुटत काही कळत नाही. असं करु नका; आपल्या शरीराची काळजी घ्या.

आपले शरीर हाडांवर टिकून आहे, हाडे जितके मजबूत शरीर तितकंच निरोगी. हाडांसाठी सर्वात महत्वाचे पोषक घटक म्हणजे कॅल्शियम. हे खनिज अनेक गोष्टींमध्ये आढळते, पण दुधात त्याचे प्रमाण खूप जास्त असते.

आपण लहानपणी नेहमी दूध पेयचो. आई सकाळी शाळेत जाण्याआधी 1 ग्लास दूध देयची. कधी कधी त्यात बोर्न व्हिटा किंवा आणखीन कोणते प्रॉडक्ट टाकून देयची. ही सवय मोडते कॉलेजला आल्यावर. आपण काही लहान आहोत का असं म्हणत तरुण पिढी दूध पिणे टाळून चहा पियू लागते.

Milk And Calcium
World Milk Day : दूधात विषारी यूरिया तर मिसळलेला नाही? लगेच 30 सेकंदात घरी असं चेक करा

शरीराला दररोज सर्व खनिजांची आवश्यकता असते. ज्याचे प्रमाण लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळे असते. ही पातळी पुरुष आणि स्त्रियांसाठी देखील भिन्न असू शकते. चला जाणून घेऊया दुधात किती कॅल्शियम असते.

दुधात किती कॅल्शियम असते

पबमेडवर प्रकाशित झालेल्या संशोधनात दुधात कॅल्शियमचे प्रमाण सांगितले आहे. संशोधनानुसार (संदर्भ), दूध कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. ज्याच्या 100 mL मध्ये 110 mg कॅल्शियम आढळते. यासोबतच तुम्हाला इतर पोषक घटकही मिळतात.

Milk And Calcium
Soya Milk Benefits: हाडांच्या मजबुतीपासून ते निरोगी हृदयासाठी सोया मिल्कचे चे फायदे

एका दिवसात किती कॅल्शियम आवश्यक आहे?

NIH च्या ऑफिस ऑफ डायटरी सप्लिमेंट्स (संदर्भ) नुसार, 9 ते 18 वयोगटातील लोकांना दररोज 1300 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. जे 19 वर्षे ते 50 वर्षांपर्यंत 1000 mg राहते. त्याच वेळी, गर्भवती आणि स्तनपान करणा-या महिलांना या खनिजाची या प्रमाणापेक्षा जास्त गरज असते.

एवढं कॅल्शियम तुम्हाला 1 लिटर दुधापासून मिळेल

संशोधनात दिलेल्या माहितीवरून मोजले तर 1 लिटर दुधात सुमारे 1100 मिलीग्राम कॅल्शियम असते. जे रोजच्या गरजेच्या जवळपास आहे. पण, एका दिवसात इतके दूध पिणे अवघड काम आहे म्हणूनच कॅल्शियम देणारे इतर पदार्थही खाल्ले जाऊ शकतात.

Milk And Calcium
Donkey Milk Benefits: गाढवाचं दूध लय भारी, त्वचा होईल आलियासारखी नितळ गोरी

सोयाबीन

अर्धा कप सोयाबीनमध्ये सुमारे 131 मिलीग्राम कॅल्शियम असते. हे हाडांसाठी चांगले खाद्य असल्याचे सिद्ध होऊ शकते. या खाद्यामध्ये प्रथिने देखील भरपूर असतात, ज्यामुळे स्नायू वाढण्यास देखील मदत होते.

खसखस

खसखस हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण, त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. खसखसच्या 1 चमचेमध्ये सुमारे 127 मिलीग्राम कॅल्शियम असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.