Cancer Risk: तरूणांमध्ये वाढतोय कॅन्सर, शास्त्रज्ञांनीच सांगितली कारणं; वेळीच काळजी घ्या!  

स्तनांच्या कर्करोगाची प्रकरणे तरुणींमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत
Cancer Risk
Cancer Riskesakal
Updated on

Cancer Risk: ज्या आजारांचे नाव ऐकून अनेकांची पाचावर धारण बसते तो म्हणजे कॅन्सर. पूर्वी या आजाराबाबत अनेक समज-गैरसमज होते. पण, आता त्यावर ठोस उपचार उपलब्ध झाले आहेत. या उपायांमुळेच अनेक तरूण कॅन्सरपासून मुक्त झाले आहेत. पण, आजाराचा धोका तरूणांमध्येच अधिक असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

कॅन्सर ही जागतिक पातळीवरील सर्वात गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. सर्व वयोगटातील लोकांना कॅन्सर होऊ शकतो, असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.

जीवनशैलीतील अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्यांमुळे या आजाराचा धोका झपाट्याने वाढताना दिसतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात आरोग्य तज्ज्ञांनी ४० ते ५० वयोगटातील कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढत असल्याचा इशारा दिला आहे.

Cancer Risk
Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर उपचारानंतर फक्त याच महिला करू शकतात ब्रेस्टफीडिंग, कारण..

कॅन्सरचा धोका जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की ४० वर्षांखालील लोकांना कॅन्सरचे निदान होण्याची शक्यता जास्त आहे. २०१० ते २०१९ या कालावधीत या वयोगटातील कर्करोगाच्या निदानाचे प्रमाण वाढल्याचे नोंदविण्यात आले आहे.

गेल्या नऊ वर्षांत हे प्रमाण एक लाख लोकांमागे १०० वरून १०३ पर्यंत वाढले असून, तरुणांमध्ये या जीवघेण्या आजाराचा धोका झपाट्याने वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, काही प्रकारच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये ही वाढ जास्त आहे. जीवनशैली आणि आहारातील अडथळ्यांसह विविध पर्यावरणीय परिस्थितीमुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे आढळले आहे.

ज्यापासून आरोग्य तज्ञ सर्व लोकांना टाळण्याचा इशारा देतात. स्तनांच्या कर्करोगाची प्रकरणे तरुणींमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत. संशोधकांना असेही म्हटले आहे की, महिलांना कर्करोगाचा धोका जास्त असू शकतो. या अभ्यासासाठी संशोधकांनी ५ लाखांहून अधिक लोकांचा समावेश केला होता.  (Cancer)

महिलांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, तर ५० वर्षांखालील पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण ५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक प्रकरणे ५० ते ५ वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहेत. कॅन्सरग्रस्त तरुणांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे त्याचे वेळीच निदान होत नाही, ज्यामुळे कॅन्सर पसरण्याचा धोका जास्त असू शकतो.

अभ्यास अहवालात असे आढळले आहे की स्तनाचा कॅन्सर हा तरुण लोकसंख्येवर परिणाम करणारा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, तर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) कर्करोगात सर्वाधिक वाढ झाली आहे.

कोलन कॅन्सर आणि अपेंडिक्सचा कॅन्सर असलेल्या लोकांचे प्रमाण १५% ने वाढल्याचे दिसून आले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असताना वृद्ध लोकसंख्येतही ते कमी होताना दिसत आहे.

Cancer Risk
Colon Cancer Symptoms : 5-10 वेळा ढेकर येताहेत? करू नका दुर्लक्ष, असू शकतात गंभीर प्रकारच्या कॅन्सरची लक्षणे

संशोधक काय म्हणतात?

संशोधकांचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारची आकडेवारी पाहिली जात आहे, ती पाहता तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची कारणे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा धोका कशामुळे निर्माण होतो हे जर आपण समजून घेतले नाही.

ते बदलण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर जीवघेणा कर्करोगामुळे जागतिक स्तरावर दबाव बराच वाढण्याची भीती आहे. कॅन्सर हा नेहमीच एक मोठा चिंतेचा विषय राहिला आहे, या अभ्यासाच्या अहवालाने त्याचा धोका आणखी वाढवला आहे. (Youth)

Cancer Risk
Mobile Cancer Threat : 'या' कंपन्यांचे फोन वापरल्याने वाढू शकतो कॅन्सरचा धोका; रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती!

तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण का वाढत आहे हे अभ्यासाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु शास्त्रज्ञांना लठ्ठपणा, मद्यपान आणि धूम्रपान, झोपेची कमतरता, गतिहीन जीवनशैली आणि वातावरणातील प्रदूषण यासारखी काही संभाव्य कारणे यासाठी प्रमुख जोखीम घटक असल्याचे आढळले आहे.

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, सर्व लोकांनी कर्करोगाच्या जोखमीबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे, जर आपल्याकडे आधीच जोखीम घटक असतील किंवा कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल तर डॉक्टरांना भेटणे अधिक महत्वाचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.