Car Driving Tips: गाडी चालवताना होणार नाही अपघात, फक्त लक्षात ठेवा बसण्याची 'ही' योग्य पद्धत

Car Driving Tips: कारने लांबचा प्रवास करताना बसण्याची पद्धत योग्य असावी अन्यथा पाठदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
गाडी चालवताना होणार नाही अपघात, फक्त लक्षात ठेवा बसण्याची योग्य पद्धत कोणती
Car Driving Tips:Sakal
Updated on

Car Driving Tips: अनेक लोकांना कार चालवणे सोपे वाटते. पण तुम्हाला माहिती आहे काकार चालवताना अनेक लोक चुकीच्या पद्धतीने बसतात. ज्यामुळे लांबच्या प्रवासात चुकीच्या पद्धतीने बसल्यास अनेक शरीराशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हीही कार चालवत असाल तर बसण्याची योग्य पद्धत कोणती आणि चुकीच्या पद्धतीने कार चालवल्यास कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया.

तोटे कोणते आहेत?

गाडी चालवताना किंवा प्रवास करताना चुकीच्या स्थितीत बसल्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वात आधी चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे आराम मिळत नाही आणि थोड्याच अंतरावर थकवा जाणवू शकतो. याशिवाय अपघात झाल्यास चुकीच्या स्थितीत बसल्याने दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. काही परिस्थितींमध्ये चुकीच्या स्थितीमुळे, ड्रायव्हर्स कारवरील नियंत्रण खूप लवकर गमावतात.

कार चालवताना बसण्याची योग्य स्थिती कोणती?

प्रवासा दरम्यान अपघात टाळण्यासाठी आणि आराम करण्यासाठी व्यक्तीने नेहमी योग्य स्थितीत बसून कारमध्ये प्रवास केला पाहिजे. गाडी चालवताना किंवा बसताना नेहमी तुमची पाठ सरळ असावी. सीट अशा प्रकारे बनवली आहे की ती पाठीला अधिक आराम देते. पण हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही योग्य स्थितीत बसाल. जर वाहनचालक योग्य स्थितीत बसला असेल तर त्याला स्टीयरिंग व्हील पकडण्यात कोणतीही अडचण येत नाही. याशिवाय, जर तुमचे पाय पेडलपर्यंत सहज पोहोचू शकत असतील तर तुम्ही योग्य स्थितीत बसला आहात.

गाडी चालवताना होणार नाही अपघात, फक्त लक्षात ठेवा बसण्याची योग्य पद्धत कोणती
Car Care : कारमधील एसी फॅनचा वेग वाढवल्यास मायलेज कमी होऊ शकते का? जाणून घ्या सविस्तर

फायदे कोणते आहेत?

जर तुम्ही गाडीत योग्य स्थितीत बसून प्रवास करत असाल किंवा गाडी चालवली तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. सर्वात आधी तर योग्य स्थितीमुळे लांबच्या प्रवासातही कमी थकवा जाणवतो. दुसरीकडे लांबचा प्रवास करूनही शरीरीक वेदना होत नाहीत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.