Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Car Maintenance Tips: उन्हाळ्यात कारची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा प्रवासा दरम्यान अडचणी येऊ शकतात.
Car Maintenance Tips
Car Maintenance TipsSakal
Updated on

कार खरेदी केल्यावर त्याची काळजी घेणे देखील गरजेचे असते. उन्हाळ्यात प्रवासा दरम्यान अडचणी येऊ नये यासाठी कारची वेळेवर सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. जर कारची योग्य वेळी सर्व्हिसिंग केली गेली नाही, तर कारचे भाग लवकरच खराब होऊ शकतात आणि तुमची कार योग्यरित्या कार्य करू शकणार नाही. कार दीर्घकाळ चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया.

कारचे टायर तपासणे

कारचे वेळोवेळी टायर तपासले पाहिजेत. गाडीच्या टायरमध्ये भरलेली हवा टायर प्रेशर चेकिंग यंत्राने तपासली पाहिजे. गाडीचा टायर खराब झाल्यास लगेच बदलावा. खराब टायरमुळे अपघाताचा धोका वाढू असतो.

कुलंट तपासणी करावी

प्रवासा दरम्यान गाडीचे इंजिन जास्त गरम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी कुलंटची पातळी योग्य असणे महत्वाचे आहे. कारमधील कोणत्याही प्रकारच्या ऑइलच्या गळतीमुळे कारच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

Car Maintenance Tips
Dead Pedal: कारमध्ये डेड पॅडल का असतो? जाणून घ्या फायदे

तेल तपासावे

उन्हाळ्यात कारमध्ये टाकलेल्या पेट्रोल आणि डिझेलची पातळी खूप कमी होऊ देऊ नका. कारमधील तेल कमी झाल्यास त्याचा परिणाम इंजिनवर होतो. यामुळे इंजिनचे ऑइल देखील वेळोवेळी बदलले पाहिजे

कारच्या ब्रेकची काळजी

कारच्या ब्रेकची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. कारचे ब्रेक लवकर लागत नसेल किंवा त्यातून आवाज येत असेल तर लगेच बदलावे. कार तसेच इतर कोणत्याही गाड्यांचे ब्रेक चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे.

वेळेवर सर्व्हिसिंग करावी

उन्हाळ्यात कारच्या सर्व्हिसिंगकडे लक्ष द्यावे. कारण यामुळे कारच्या सर्व पार्टची तपासणी केली जाते. यामुळे तुम्ही दुरच्या प्रवास करत असाल तर त्यापुर्वी कारची योग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.