Car Mileage Tips: 'या' टिप्सनी वाढवा कारचा मायलेज, इंधनाची होईल बचत

तुम्हीही कारचा मायलेज वाढवून इंधनाची बचत करू शकता. यासाठी पुढील टिप्स मदत करतील.
Car Mileage Tips
Car Mileage TipsSakal
Updated on

car mileage tips follow these increase car mileage save fule

देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर वेळोवेळी वाढतच असतात. हा नेहमीच सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय राहिला आहे. तुम्ही काही टिप्स वापरून या समस्येवर मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स ज्यामुळे इंधनाची बचत होऊन गाडीचा मायलेज वाढेल.

  • सिंग्नलवर गाडी बंद करावी

अनेक लोक सिंग्नलवर गाडी बंद करत नाही. यामुळे इंधन जास्त लागते. ही सवय बदलणे गरजेचे आहे. सिंग्नलवर गाडीचे इंजिन बंद करावे. यामुळे इंधनाची बचत होते.

  • ॲक्सिलेटरवर जास्त दबाव न टाकणे

गाडी चालवताना एक्सलेटरवर जास्त दाब देऊ नका. ॲक्सिलेटरवर जास्त दाब दिल्यास गाडीच्या इंजिनला सामान्य स्थितीपेक्षा जास्त काम करावे लागते. यामुळे इंधनाचा खर्च वाढतो.

  • टायर

प्रवासाला जाण्यापुर्वी टायरमधील हवा चेक करावी. यामुळे इंजिनवर दबाव येते नाही. तसेच इंधनाचा खर्चही कमी होतो.

Car Mileage Tips
Charging Cable: लॅपटॉप,मोबाईल चार्जरची वायर अस्वच्छ झालीय? करा 'हे' घरगुती उपाय, येईल नवी चमक
  • चांगला रस्ता

गाडीने प्रवास करताना चांगल्या रस्त्याचा वापर करावा. यामुळे इंधनाची बचत होते. यामुळे गाडी आणि टायर देखील खराब होणार नाही. कार चुकूनही खराब रस्त्यावर चालवू नका.

  • योग्य काळजी

अनेक लोक गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग करत नाही. यामुळे गाडीचा मायलेज कमी होऊन खराब होऊ शकते. यामुळे गाडीची वेळेवेळी सर्व्हिसिंग करावी. यामुळे गाडीवर जास्त ताण येत नाही आणि इंधन जास्त खर्च होत नाही.

  • एअर फिल्टर

कारचे एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवावे. यामध्ये घाण साचल्यास मायलेज कमी होऊ शकतो. तसेच इंजिनवर जास्त दबाव येऊन कारचा मायलेज कमी होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.