Healthy Food : आपली लाईफस्टाईल चांगली नसेल तर आपल्याला अनेक आजार होतात. या अनेक आजारांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांचा समावेश होतो. हे केवळ व्यायामाचा अन् पौष्टीक आहाराचा अभाव यामुळेच होते.
मधुमेह झाल्यानंतर अन् वजन आवाक्याबाहेर गेल्यानंतर गोड खाणं बंद करणारे अनेक लोक आहेत. पण, वेळीच काळजी घेऊन आहार आणि व्यायामाचं नियोजन करणारे, प्रकृती चांगली रहावी यासाठी प्रयत्न करण्याचा विचार सध्या लोक करत नाहीत.
तुम्हालाही या दोन समस्यांशी झगडावे लागत असेल तर तुम्ही कशाचे सेवन करावे, याची आज आपण माहिती घेऊयात.
तुमच्या या समस्यांवर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कार्बोहायड्रेट हे एक पोषक तत्व आहे ज्याला खूप वाईट नाव आहे कारण ते लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेहासह अनेक आरोग्य समस्यांशी जोडलेले आहे. त्यामुळेच आपल्याला अनेकदा कमी कार्बयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्ही असे पदार्थ शोधत असाल ज्यात कार्बोहायड्रेट जास्त असेल परंतु ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतील. हेल्थलाइनचा हवाला देत आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
केळी
कार्बोहायड्रेट्सचा सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे केळी. केळी हे एक अतिशय सामान्य फळ आहे. जे जगातील बहुतेक भागांमध्ये खाल्ले जाते. ते सर्वच सिझनमध्ये मिळते. एका केळीमध्ये 31 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आढळतात. त्यामध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित करू शकते.
ओट्स
ओट्स बहुतेक वेळा नाश्त्यासाठी बनवले जातात. ओट्समध्ये सुमारे 70 टक्के कार्बोहायड्रेट्स असतात, त्यासोबत अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे तुम्ही नाश्त्याला काहीतरी पौष्टीक खाण्याचा विचार करत असाल तर ओट्स बेस्ट ठरू शकतात.
संत्री
संत्री हे लिंबूवर्गीय फळ आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकते, जरी त्यात कार्बोहायड्रेट्स देखील असतात. जर तुम्ही 100 ग्रॅम संत्री घेतली तर त्यात सुमारे 15.5 ग्रॅम कर्बोदके असतील. तुमची नजर कमजोर झाली असेल तरी देखील या फळाचा जास्त फायदा होऊ शकतो.
क्विनोआ
क्विनोआ हे एक पौष्टिक बियाणे आहे ज्याची गणना उच्च कर्बोदकांच्या आरोग्यदायी पदार्थांमध्ये केली जाते. शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे 70 टक्के कार्बोहायड्रेट आढळतात, जरी ते प्रथिने आणि फायबरचा एक चांगला स्रोत आहे.
रताळे
अर्धा कप मॅश केलेल्या रताळ्यामध्ये सुमारे 20.7 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. रताळे हे जमिनीच्या पोटात उगवलेले एक पौष्टीक कंदमुळ आहे. रताळे कर्बोदकांचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत. हे खाल्ल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम देखील मिळते.
रताळे हलके गोडसर असते. त्यामुळे ते तुमच्या शरीरातील साखरेची कमतरताही भरून काढतात. त्यामुळे मधुमेह अन् वाढलेलं वजन नियंत्रणात राहतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.