Cardamom Water For BP : वेलचीचे पाणी प्यायल्याने ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

हिरवी वेलची बीपीसाठी चांगली आहे का?
Cardamom Water For BP
Cardamom Water For BPesakal
Updated on

Cardamom Water For BP : वेलची जवळपास प्रत्येक घरात वापरली जाते. वेलचीची लागवड दक्षिण भारत, श्रीलंका, दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य अमेरिकेत केली जाते, तिला सुगंध आणि चवीमुळे 'मसाल्यांची राणी' म्हटले जाते. घरी चहा किंवा खीर बनवण्यासाठी वेलची वापरली जाते.

पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो. तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो.

केशर आणि व्हॅनिला नंतर वेलची हा जगातील तिसरा सर्वात महाग मसाला आहे. आयुर्वेदातही अनेक समस्यांवर वेलची फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. चला जाणून घेऊया वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे.(Cardamom Water For BP : Blood pressure will remain under control by drinking cardamom water, know its surprising benefits)

Cardamom Water For BP
वेलची चहा बनवण्याची ही आहे योग्य पद्धत; मधुमेहींसाठी हा चहा अत्यंत उपयुक्त

वेलचीमध्ये आवश्यक घटक असल्यानं त्यामुळे नपुंसकता, इरेक्टारइल डिस्फंक्शन और इंफर्टिलिटी यासारख्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. तसेच वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होतं. घसा दुखणं किंवा खवखव असल्यास वेलचीच्या सेवनानं नक्कीच आराम मिळतो. तसंच वेलचीच्या सेवनानं रक्ताची असणारी कमतरताही दूर होते. (Cardamom)

वेलचीमध्ये हे गुणधर्म असतात

वेलचीमध्ये आढळणारे घटक बघितले तर त्यात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस आढळतात. जे निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे अशा स्थितीत पुरुषांनी याचे सेवन नक्की करावे.

हिरवी वेलची बीपीसाठी चांगली आहे का?

वेलचीमध्ये रायबोफ्लेविन, नियासिन, मिनरल्स, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च अँटिऑक्सिडेंट असल्याने, वेलचीचे पाणी प्यायल्याने रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांना आराम मिळतो.

लहान वेलची फायब्रिनोलिसिस वाढवते आणि रक्तातील लिपिड आणि फायब्रिनोजेनची पातळी बदलल्याशिवाय हायपरटेन्सिव्ह व्यक्तींमध्ये अँटिऑक्सिडंट स्थिती सुधारते. (Blood Pressure)

Cardamom Water For BP
Cardamom Benefits : वेलची पुरूषांसाठी कशी फायदेशीर?

हिरवी वेलची पचनासाठी चांगली आहे का?

वेलचीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही. वेलचीचे पाणी प्यायल्याने भूक वाढते आणि चयापचय वाढतो. अस्वस्थता, मळमळ, उलट्या यापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो.

याशिवाय वेलचीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. रोज वेलचीचे पाणी प्यायल्याने शरीरात साठलेली चरबी सहज वितळते. एवढेच नाही तर वेलचीमध्ये एक विशेष प्रकारचे एन्झाइम आढळते, जे कॅन्सरशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे.

तणावमुक्त राहण्यासाठी

तणावमुक्तीसाठी वेलची खाणे फायदेशीर ठरते. तणावात असताना वेलची तोंडात घालून चावा. वेलचीमुळे हार्मोन्समध्ये पटकन बदल होऊन तणावमुक्त होण्यास मदत होते.

Cardamom Water For BP
बया... बदाम-वेलची खाऊनही कमी होतं वजन; जाणून घ्या कसं

हृदयाची गती सुरळीत होण्यासाठी

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयासंबंधिचे आजार जडतात. पण हृदयाची गती सुरळीत ठेवण्यासाठी वेलची खाणे फायदेशीर ठरते. त्यात पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पदार्थ असतात. त्यामुळे या सर्व पोषकघटकांचा लाभ शरीराला होतो.

पुरुषांनी या वेळेत खावी वेलची

पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी किमान 2 वेलची खावी. रोज वेलची खाल्ल्याने पुरुषांमधील नपुंसकता दूर होते. कारण वेलची लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. तुम्ही ते पाणी किंवा दुधासोबत घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला याचा फायदाच मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.