पावसाची दमदार एन्ट्री; कार्टून, टू इन वन, ब्रॅंडेड रेनकोटने बाजारापेठा सजल्या

Monsoon Fashion: पावसाचे आगम होताच बाजारात आकर्षक रेनकोट, कॅप आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे.
Raincoat, Umbrella
Raincoat, UmbrellaSakal
Updated on

Monsoon Care: शहर परिसरात दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच तडाखा दिला. पावसाचे आगम होताच बाजारात आकर्षक रेनकोट, कॅप आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे. या उत्पादनांना महागाईचा फटका बसला असून, दरात १५ टक्के वाढ झाली आहे.

रेनकोटमध्ये महिलांसाठी लांबीचे रेनकोट, पुरुषांसाठी पॅंट-शर्ट प्रकारातील रेनकोट उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीसाठी कार्टूनची चित्रे असलेले रेनकोट उपलब्ध आहेत. टू इन वन म्हणजे दोन्ही बाजूंनी वापरण्याचे रेनकोट देखील मिळत आहेत. ब्रॅंडेड प्रकारात देखील रेनकोटची विक्री चांगली होत आहे.

प्लॅस्टिकच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. त्याचा फटका दरांना बसला आहे. बाजारपेठेला मुंबई, दिल्ली येथून हा माल सर्वाधिक पुरविला जातो. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून, त्यामुळे देखील किमतीत वाढ झाली आहे. सिझन असल्यामुळे रेनकोट विक्रेत्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातूनही ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यामुळे व्यवसाय चांगला होतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Raincoat, Umbrella
Monsoon Skin Care: कीटक दंश झाल्यास घाबरू नका

१७५ रुपयापांसून ते २ हजारांपर्यंत रेनकोट

१७५ रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत रेनकोट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कमी तसेच जास्त दराचे रेनकोट उपलब्ध असून, बरेच ग्राहक हे चांगल्या दराच्या रेनकोटची मागणी करतात, तर काही ग्राहकांना कमीत-कमी किमतीत रेनकोट खरेदी करायचा असतो. त्यामुळे विक्रेत्यांकडे दोन्ही प्रकारचे रोनकोट उपलब्ध आहेत.

विविध प्रकारचा माल उपलब्ध असून, यंदा दरात १५ टक्के वाढ झाली आहे. हलका-भारी दोन्ही प्रकारचा माल असून ग्राहकाला जो परवडतो, तो माल तो खरेदी करतो. यंदा अनेक प्रकार रेनकोटमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

— शेख सोफियान (रेनकोट विक्रेता)

Related Stories

No stories found.