Celebs Fashion : या अभिनेत्रींही ट्राय केलीय ‘टाय ऍन्ड डाय’ साडी ; फेस्टीव सिझनसाठी आहे परफेक्ट

सध्या ‘टाय ऍन्ड डाय’ साडीचा ट्रेंड
Celebs Fashion
Celebs Fashion esakal
Updated on

पुणे : बॉलिवूड अनेकदा फॅशनच्या जगात नवीन ट्रेंड सेट करते. सणासुदीचा काळ जवळ येताच बाजारात नवा ट्रेंड कोणता आलाय,हे चेक केले जाते. ट्रेंड समजला तरी आपल्यावर काय सुट होईल. नक्की काय घ्यावे यासाठी तरूणींचा गोंधळ उडतो. अशावेळी आवडत्या सेलिब्रीटींनी कोणत्या कार्यक्रमात काय घातले होते. तसाच ड्रेस किंवा साडी आपल्यासाठी निवडतात.

Celebs Fashion
Go Fashion: गो फॅशनच्या शेअर्सने गाठला नवा उच्चांक, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

बॉलिवूड आभिनेत्री, शिल्पा शेट्टी, माधुरी दिक्षित, कियारा आडवाणी यांनी एका साडीची फॅशन मार्केटला आणली आहे. सध्या ‘टाय ऍन्ड डाय’ साडीची चलती आहे. या अभिनेत्रींनीही ही साडी नेसून फोटोशूट केले आहे. या साड्यांवरील अभिनेत्रींचा क्लासी लुक पाहुयात.

Celebs Fashion
Fashion Tips : गौहर खानचा ग्रीन एथनिक को-ऑर्ड सेटमधील क्लासी लुक पाहिला का?

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी नेहमीच ग्लॅमरस दिसते. ति नेहमी हटके स्टाइल करते. 40 ओलांडल्यानंतरही मॉडर्न लूकलामुळे ती यंगर्ससाठी स्टाईल आयकॉन आहे. शिल्पाची ही ‘टाय ऍन्ड डाय’ साडी अतिशय क्लासी आणि स्टायलिश आहे. यावर शिल्पाने मॅचिंग ब्लाउज घातला आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउजही निवडू शकता.

Celebs Fashion
Fashion: ऑफीसमध्ये 'या' रंगाचे शर्ट दिसतात क्लासी

कियारा अडवाणी

कियारा अडवाणीने देखील एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ही गुलाबी आणि पांढरी कॉम्बिनेशन ‘टाय ऍन्ड डाय’ साडी घातली होती. जी तिच्यावर खूप खुलून दिसत होती. कियाराने या गुलाबी रंगाच्या सिक्विन साडीवर स्ट्रेपी ब्लाउज घातला आहे. यासोबतच तिने गळ्यात स्टायलिश चोकर घातला होता. कियाराचा हा साडीचा लूक तुमचा फेस्टिव्ह लूकही बनू शकतो.

Celebs Fashion
Fashion : ऑफ व्हाइट साडीतला जेनेलियाचा गजरा आणि नथीचा नखरा पाहीलात का?

डायना पेंटी

डायना पेंटीने उमंग 2020 मध्ये ही सुंदर ‘टाय ऍन्ड डाय’ घातली होती. डायनाने यावर फ्लोरल बँड्यू स्ट्रॅपलेस ब्लाउज घातला होता. यासह, पिंक रंगाच्या चोकरने तिच्या लूकमध्ये भर घातली.

Celebs Fashion
Fashion: नवरात्रीत लेहंगा घालायचाय? 'या' अभिनेत्रींसारखा लूक कराल तर खुलून दिसाल!

रश्मी देसाई

रश्मी देसाईने नुकतीच ही ‘टाय ऍन्ड डाय’ साडी नेसली होती. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साडीसह क्विन फॅशनेबल मॅचिंग ब्लाउज घातला होता. या साडीत रश्मी ग्लॅमरस दिसत होती. या सुंदर साडीसोबत रश्मीने लाइट मेकअप केला होता. कोणतीही ज्वेलरी नाही तर फक्त कानातलेही तिच्यावर सूट होत होते.

Celebs Fashion
Fashion: हटके दिसायचं असेल तर Height Wise असावी कपड्यांची चॉईस; दिसाल प्रेझेंटेबल

माधुरी दिक्षीत

माधुरीने काही दिवसांपूर्वी ही गुलाबी रंगाची ‘टाय ऍन्ड डाय’ साडी घातली होती. माधुरीने डार्क गुलाबी रंगाच्या साडीवर सिल्व्हर मिरर वर्कचा ब्लाउज घातला होता. साडीतही लेस कॉर्नरवर ब्लाऊजचे मॅचिंग मिरर वर्क होते. माधुरीचा हा लूक खूपच क्लासी दिसत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.