Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीत ९ दिवसांत सुटलेले पोट अन् वजन होईल कमी, वाचा संपूर्ण डाएट प्लान

जाणून घेऊया चैत्र नवरात्रीत कसा डाएट ठेवल्याने तुमचे वजन होईल कमी
Weight Loss
Weight Lossesakal
Updated on

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी लोक बरेच उपाय करत असतात. आता चैत्र नवरात्री सुरु होतेय. तेव्हा तुम्ही या नवरात्रीत उपवास करूनही तुमचं वजन कमी करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती हव्यात. तेव्हा जाणून घेऊया चैत्र नवरात्रीत कसा डाएट ठेवल्याने तुमचे वजन होईल कमी.

योग्य आहाराची माहिती नसल्याने नवरात्रीच्या काळात काहींचे वजन वाढते. काही लोक या उपवासात दिवसभर उपवास करतात आणि नंतर रात्री तुपात बनवलेल्या अन्नाने उपवास सोडतात, हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. तेव्हा नवरात्रीमध्ये वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लान असायला हवा.

वजन कमी करण्याच्या नादात ही चूक करू नका

नवरात्रीच्या उपवासात वजन कमी करायचे असेल तर काही गोष्टी पूर्णपणे टाळा. उपवासाच्या वेळी वेट लॉस डायट प्लॅनमध्ये कुट्टूची पुरी आणि बटाटा चिप्स खाऊ नका. ते वजन वाढवू शकतात. उपवास करताना जेवण स्किप करु नका. यामुळे दिवसभर चालण्याऐवजी सकाळी लवकर फिरायला जा.

नवरात्रीत कसे करावे वेट लॉस

पहिला दिवस

नाश्ता - बदामाच्या दुधासह भाजलेले मखाना

मिड मॉर्निंग - नारळाचे पाणी

दुपारचे जेवण - पनीर आणि कुट्टूची पोळी

संध्याकाळ - फ्रूट चाट

डिनर- कमी तूपातील पालकाची भाजी आणि उकडलेले बटाटे

दुसरा दिवस

नाश्ता - केळीचा शेक (चिया सीड्ससोबत)

मिड मॉर्निंग - नारळाचे पाणी

दुपारचे जेवण - फळांचा रायता

संध्याकाळ - काकडीची कोशिंबीर किंवा रायता

रात्रीचेजेवण - तुपाशिवाय कुट्टूची भाकरी आणि दही

Weight Loss
Weight loss साठी सकाळी गरम पाणी नाही तर हे पाणी प्या, झटपट परिणाम

तिसरा दिवस

नाश्ता - कुट्टूचा चीला

मिड मॉर्निंग - नारळाचे पाण्याचे

जेवण - उकडलेले बटाट्याचे सॅलड आणि दही किंवा भाजी

संध्याकाळ – काकडी रायता

रात्रीचेजेवण – स्ट्रॉबेरी आणि केळी शेक

चौथा दिवस

नाश्ता- शिंगाड्याची इडली

मिड मॉर्निंग- फळे

दुपारचेजेवण- भगर

संध्याकाळ- ग्रीन टी

डिनर- दुधी भोपळ्याची भाजी आणि दही

Weight Loss
Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्री सुरू होण्याआधीच उरकून घ्या ही कामं, नाहीतर...

पाचवा दिवस

नाश्ता – पपई शेक

मिड मॉर्निंग – लिंबू पाणी आणि एक फळ

दुपारचेजेवण – भाज्यांनी बनवलेली साबुदाणा टिक्की आणि दही

संध्याकाळ - ग्रीन टी

डिनर – भाज्यांची कोशिंबीर

सहावा दिवस

नाश्ता - पनीरने भरलेला कुट्टू चीला

मिड मॉर्निंग- नारळ पाणी

दुपारचे जेवण- वरईचा भात किंवा भगर

संध्याकाळी - ग्रीन टी

रात्रीचे जेवण- पनीरसोबत काही भाज्य

सातवा दिवस

नाश्ता - कट्टूचा डोसा

मिड मॉर्निंग- नारळ पाणी

दुपारचे जेवण - कट्टूच्या पीठाची पोळी आणि रायता

संध्याकाळ- ग्रीन टी

डिनर- दूध आणि काही फळे

आठवा दिवस

नाश्ता - साबुदाणा खिचडी

मिड मॉर्निंग - फ्रूट चाट

लंच- तेल शिवाय बनवलेले पालक पनीर

संध्याकाळ- ग्रीन टी

डिनर- वरईचा भात (Chaitra Navratri)

नववा दिवस

नाश्ता - बदाम असलेली मखाना खीर

मिड मॉर्निंग - संत्र्याचा रस

दुपारचे जेवण - अननस आणि डाळिंब रायता

संध्याकाळ - ग्रीन टी

डिनर - रताळे चाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.