Chamomile Tea Benefits: झोपेसाठी गोळ्यांचा ओव्हरडोस हानिकारक ठरेल,हा चहा प्या आणि शांत झोप घ्या!

झोपेचं सोप्प गणित; हा चहा प्या आणि शांत झोप घ्या
Tea For Good Sleep
Tea For Good Sleepesakal
Updated on

Tea For Good Sleep : सकाळी फ्रेश होऊन बाहेर आलो तरी लोक जांभया देतात. कारण, त्यांची झोप पूर्ण झालेली नसते. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते, निद्रानाश, मायग्रेन असे आजारही मागे लागतात.

काही लोकांना झोपायला वेळ पुरत नाही. रात्री उशीरा घरी येतात आणि पहाटे लवकर निघायचं असतं. तर काही लोकांना वेळच वेळ असतो पण झोप येत नाही. अशा झोप न येणाऱ्या लोकांचा निद्रानाश झाला असे म्हटले जाते.

या आजारावर उपचार म्हणून डॉक्टरांना भेटलो तर ते झोपेच्या गोळ्या देतात. पण या गोळ्यांची सवय लागणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.  त्यामुळेच एक प्रकारच्या घरगुती उपायाने तुम्हाला शांत झोप मिळू शकते. ती कशी ते पाहुयात. (Chamomile tea benefits in marathi)

Tea For Good Sleep
Sleeping Habits : रात्री सतत जाग येणं असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण, आजच घ्या काळजी

तुम्ही कॅमोमाइलबद्दल ऐकले आहे का?

कॅमोमाइल हे एक प्रकारचे फूल आहे. हे फूल खूप सुंदर दिसते. यापासून बनवलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कॅमोमाइल विशेषतः आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेत आढळते.

कॅमोमाइलचा उपयोग हर्बल टीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. त्यात अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.  

कॅमोमाइल चहाची चव सौम्य गोड असते. हे प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया कॅमोमाइल चहाचे फायदे.

शांत झोप येते 

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात . निरोगी राहण्यासाठी, आरोग्य तज्ञ दररोज 7-8 तास झोपण्याची शिफारस करतात. जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर कॅमोमाइल चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हे प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल. रात्रीच्या जेवणानंतर शांत झोपण्यासाठी तुम्ही हा चहा पिऊ शकता.

Tea For Good Sleep
Over Sleeping Symptoms : सतत आसळ, झोप येत असेल तर हे उपाय करा; शरीरात नवा उत्साह संचारेल

पचनासाठी फायदेशीर

पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी, आपण जेवणानंतर सुमारे एक तासाने कॅमोमाइल चहा पिऊ शकता. हे प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार टाळता येतात.

सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास प्रभावी

जर तुम्ही सर्दी-खोकला आणि घसादुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी कॅमोमाइल हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला सर्दीमध्ये चोंदलेल्या नाकापासून त्वरीत आराम मिळू शकतो. आपण कॅमोमाइल स्टीम देखील घेऊ शकता. (Healthy tea

Tea For Good Sleep
तुमचं मुलंही झोपेत बडबडतं? Sleep Talking ही समस्या आहे का? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं

त्वचेसाठी फायदेशीर

कॅमोमाइल चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे तुमची त्वचा सुधारण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हा जादुई चहा नक्की प्या.

अशा प्रकारे कॅमोमाइल चहा बनवा

साहित्य - 2 टीस्पून सुकलेली कॅमोमाइल फुले, 1 -2 कप पाणी, 1 टीस्पून साखर

कृती - कढईत पाणी गरम करून त्यात कॅमोमाइलची फुले टाकून चांगली उकळा.

आता ते गाळून त्यात चवीनुसार साखर किंवा गूळ घाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.