Chanakya Niti : चाणक्य म्हणतात, ‘या’ गोष्टी कधीच कोणालाही सांगू नका? नाहीतर होईल पश्चाताप!

आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी हलक्यात घेऊ नका, नाहीतर...
Chanakya Niti
Chanakya Nitiesakal
Updated on

Chanakya Niti : चाणक्य यांना  विष्णूगुप्त कौटिल्य म्हणूनही ओळखले जाते. ते सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होते. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो.

आचार्य चाणक्य यांनी अर्थशास्त्राव्यतिरिक्त नीतिशास्त्राची रचना केली. आचार्यांनी रचलेली संहिता सध्याच्या काळासाठीही महत्त्वाची आहे. यामध्ये व्यक्तीला सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजनैतिक धोरणांच्या वापराबाबत सल्ला मिळतो. आचार्य चाणक्यांचे नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक धोरणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti : तरुणांनो! उज्ज्वल भविष्याच्या विचारात असाल तर 'या' गोष्टींपासून दूर रहा

जी तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. आचार्य चाणक्य यांची धोरणे इतकी प्रभावी आहेत, की आजही माणसाला कोणत्याही संकटातून किंवा संकटातून बाहेर पडण्यास मदत करतात. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात सांगितले आहे की, कधी कधी माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी येतात ज्या कोणाला सांगू नयेत.

तुमचं दु:ख तुम्ही स्वतःचं समजून इतरांना सांगाल, पण ज्याला तुम्ही तुमचं समजता तो तुमचा झाला नाही तर तुमची फक्त चेष्टाच होईल. अशा गोष्टींचा फायदा घेण्यास लोक उशीर करत नाहीत. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Chanakya Niti
Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' गोष्टी महिला करतात लगेच नोटीस

तूमचे नुकसान शेअर करू नका

तूम्हाला नोकरी, व्यवसायात नुकसान झाले. तर, ते कधीही कोणाला सांगत बसू नका. कारण, त्यामूळे त्या लोकांच्या नजरेत तूम्ही अयशस्वी ठराल. त्यामूळे ते लोक पुन्हा कधीही तुमच्याशी व्यवसाय करणार नाहीत. तूमच्याशी व्यवहार केला तर त्यांचे नुकसान होईल अशी भीती त्या व्यक्तीला वाटेल.

पती-पत्नीतील गोष्टी

पती-पत्नीचं नातं विश्वासाच्या जीवावरच तरलेलं असतं. त्यामूळे एकमेकांमध्ये ठरलेल्या, बोललेल्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला शेअर करू नका. तूमच्यात होणारी भांडण, शारिरीक संबंधातील गोष्टी इतरांना शेअर केल्या तर त्यामूळे तूमच्यातील वाद मिटण्याऐवजी टोकाला जाण्याची शक्यता जास्त असते.  या गोष्टींवरून तूमच्या मागे लोक यावरून चेष्टाही करू शकतात.

पती पत्नीतील गोष्टी
पती पत्नीतील गोष्टीesakal
Chanakya Niti
Chanakya Niti : महाराष्ट्र शासन देणार चाणक्य नितीचे धडे!

तूमचा अपमान झाला तर

एखाद्या कारणावरून तूमचा कोणी अपमान केला. तर तो तिथेच विसरून जा. त्याचा सतत जप करत बसू नका. कोणासमोर त्याचा उल्लेख करू नका. यामूळे तुमची इमेज खराब होऊ शकते.

व्यवसायाची गुपिते

चाणक्य नीतीनुसार, आपल्या कामातील महत्त्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते.

तूमची कमकुवत बाजू

प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते. तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका. यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते. अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात.

व्यवसायातील अपयश
व्यवसायातील अपयश esakal
Chanakya Niti
Chanakya Niti : माझ्याच सोबत असं का होतं? आचार्य चाणक्य यांच्या ५ टिप्स अशाच काही वाईट प्रसंगांसाठी

काय आहे चाणक्य नीती ?

चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली.

यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. याशिवाय चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो.

Chanakya Niti
Chanakya Niti : नवरा-बायकोचं नातं खराब करू शकतात 'या' दोन चुकीच्या सवयी; वाचा, चाणक्य नीति काय सांगते...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.