Chanakya Niti For Success : आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात सांगितलेली धोरणे बरीच मुलभूत आणि काळाच्या पुढे आहेत. त्यामुळे काळ कोणताही असला तरी ते नीती मुल्ये लागू होतात. त्यांनी माणसाला पडणाऱ्या बहुतेक प्रश्नांवर उपाय किंवा काही नियम सुचवले आहेत. माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आणि टप्प्याचा त्यात विचार आढळतो.
त्यांची नीती जीवनासाठी फार उपयुक्त मानली जाते. त्याचे पालन करणारी व्यक्ती कधीही हार मानत नाही तर कठीण प्रसंगात मार्ग काढते. पण आयुष्याला कोणालाच बांधून ठेवता येत नाही. त्यामुळेच अनेकदा बिकट प्रसंग येतात. अनेक प्रयत्न करूनही ते विफळ ठरतात. अपयशच पदरी पडतं. अशावेळी निराश न होता काही उपाय चाणक्यनीती सुचवते. ते कोणते जाणून घेऊया.
चाणक्य नीती म्हणते की, अपयश हा एक धडा आहे. तुमच्या विचारात सकारात्मकता आणा. हे काम अवघड आहे असं न म्हणता ते कसं सोपं करता येईल याचा विचार करा.
मुळात ते काम का होत नाही, किंवा का बिघडत आहे याच्या कारणांचा विचार करा. तुमचं कुठे चुकतंय किंवा तुम्ही कुठे कमी तर पडत नाही याचं आत्मपरिक्षण करा.
ज्या ठिकाणी काम करायचे आहे, जे काम करायचे आहे त्याची, त्या शहराची, ठिकाणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे. कामात कोणी अडथळे आणू नये म्हणून सतर्क रहायला हवे.
सिंह जसा आपल्या शिकारावर दबा धरून बसतो, तसे तुम्ही तुमच्या लक्ष्यावर लक्ष ठेवून असायला हवे. संधी मिळताच त्यावर झडप घालायला हवी. मध्ये कितीही अडथळे आले तरी लक्ष्य ढळू द्यायचे नाही.
चाणक्यांच्या मते जे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतात, विचलन दूर करतात आणि निवडलेल्या मार्गाकडे शिस्तबद्ध दृष्टीकोन ठेवतात ते यशाच्या शिखरावर पोहचतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने कितीही कष्ट केले तरी बऱ्याचदा तो त्याच्या कर्मामुळे अयशस्वी होतो. ते म्हणतात, तुमच्या संपत्तीचा, प्रतिभेचा गर्व करू नका, दिखावा करू नका, यामुळे तुमचा राजा नाराज होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.