Chanakya Niti: रागात असताना 'या' चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर…

चला तर जाणून घेऊया रागात असताना कोणत्या लोकांशी कधीही भांडण करू नये.
Chanakya Niti
Chanakya Nitisakal
Updated on

आचार्य चाणक्य यांना त्यांच्या नीतिशास्त्रासाठी विशेष ओळखले जाते. मोठमोठे राजकारणी त्यांना फॉलो करतात. चाणक्य नितीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नितिच्या मते माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याने काही लोकांशी कधीच भांडण करू नये.

चला तर जाणून घेऊया रागात असताना कोणत्या लोकांशी कधीही भांडण करू नये. (Chanakya Niti said never argue or Quarrel in anger with these four people)

Chanakya Niti
Chanakya Niti: 'या' गोष्टींना चुकूनही लाथ मारू नका; अन्यथा आयुष्यातील आनंद निघून जाईल!

मित्रांशी भांडू नये

चाणक्य निती सांगते की रागात असताना कधीच मित्रांशी भांडू नये. मित्र पावलोपावली तुम्हाला साथ देतात. तुमची गुपिते त्यांना माहित असतात. अशात जर तुम्ही मित्रांशी भांडलात तर तुम्ही एक चांगली मैत्री तर गमवाल पण सोबतच भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता.

मूर्ख माणूस

चाणक्य नीतीनुसार मूर्ख माणसाशी भांडण करणे म्हणजे म्हशीसमोर सनई वाजवण्यासारखे आहे. अशा लोकांशी भांडून तुमचा मूड तर खराब होणार पण सोबतच तुमचा अमुल्य वेळही वाया जाणार.

Chanakya Niti
chanakya NIti: चुकूनही ‘या’ गोष्टींना पाय लावू नका, नाहीतर करावा लागेल आयुष्यभर पश्चाताप

नातेवाईक

नातेवाईकांशी रागाच्या भरात भांडणे चुकीचे असल्याचे चाणक्य निती सांगते. नातेवाईक अडीअडचणीला कामात येतात. अशात जर तुम्ही त्यांच्याशी भांडलात तर तुम्ही चांगले नातेवाईक गमवून बसाल.

गुरुशी भांडू नका

कोणत्याही व्यक्तीला समोर नेण्याचं काम गुरू करत असतात. गुरूं हेच देव असतात. त्यामुळे चुकूनही गुरूंचा अपमान करू नका. असे केल्यास तुम्ही ज्ञानापासून वंचित व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.