सध्या पावसाळा संपून हिवाळा ऋतूला सुरूवात झाली आहे. हिवाळ्याच्या सुरूवातीला सर्वत्र आजार पसरतात. थंडी पडू लागते अन् अचानक झालेल्या या हवेतील बदलामुळे सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढू लागतात.
हॉस्पिटलमध्येही सर्दी-खोकल्याचे रूग्ण गर्दी करतात. तर, यासोबतच इतरही आरोग्याच्या समस्या वाढू लागतात. केवळ सर्दी नाही तर, छातीत घरघर करणे आणि श्वास घेण्यात अडचण होणे, कफ साचणे, थंड हवेमुळे श्वसनमार्गाला सूज येणे असे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात.