- स्नेहा जोगळेकर
Cheese Chilli Appe : आपल्याकडे नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. इडली, आप्पे,डोसा,आंबोळी बनवली जाते. काही घरात तर हे नेहमीचे पदार्थ असतात. घरात काही जेवण बनवलं जात नाही. तर हे पदार्थच खाल्ले जातात.
आप्पे हा पदार्थ जरा जास्तच लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे तो बनवायला कमी वेळ लागतो. आप्पे बनवणार असाल तर तुम्ही रव्यापासून बनलेले चीज चिली आप्पे नक्की बनवू शकता. ज्यामुळे तुम्हाला वेगळी चव मिळेल. तसेच हे बनवणेही अगदी सोपे आहे. या रेसिपी स्नेहा जोगळेकर यांनी सांगितलेल्या आहेत.
साहित्य :
एक कप रवा, अर्धा कप किसलेले चीज, १ चमचा तिखट, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा कप दही, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, ग्रीसिंग आणि तेल.
कृती
एका भांड्यात रवा, दही, किसलेले चीज, तिखट, हिरवी मिरची, बेकिंग सोडा आणि मीठ मिक्स करावे. पाणी घालून घट्टसर पीठ भिजवावे व १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. आप्पेपात्राला तेल लावून तो गरम करावा. त्यात चमचा-चमचा पीठ घालावे.
कडा सोनेरी तपकिरी होईपर्यंत कमी-मध्यम आचेवर आप्पे शिजवावेत. लाकडी स्क्युअर किंवा चमच्याने आप्पे पलटून दुसरी बाजू सोनेरी होईपर्यंत शिजवावेत.
दोन्ही बाजू शिजल्या की पॅनमधून काढावेत. चीज चिली आप्पे चटणी किंवा केचपसोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
व्हेजिटेबल स्टर फ्राय
साहित्य
प्रत्येकी १ कप विविध प्रकारच्या भाज्या (ब्रोकोली, गाजर, मशरूम इ.), २ टेबलस्पून वनस्पती तेल, २ पाकळ्या लसूण चिरून, आल्याचा किसलेला १ छोटा तुकडा, सोया सॉस, मीठ आणि मिरपूड, सर्व्ह करण्यासाठी शिजवलेला भात किंवा नूडल्स, ऐच्छिक - टोफू, चिकन किंवा कोळंबी.
कृती
भाज्या नीट धुऊन त्याचे तुकडे करावेत. टोफू, चिकन किंवा कोळंबी घालायची असेल तर त्यांचे लहान तुकडे करावेत आणि ते वेगळ्या पॅनमध्ये शिजवून बाजूला ठेवावे. भाजीसाठी मोठ्या कढईत तेल गरम करावे.
तेलात किसलेला लसूण आणि आले घालून सुमारे ३० सेकंद सुवासिक होईपर्यंत परतवावे. मग भाज्या घालाव्यात. ३-५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत परतावे. गाजर आणि ब्रोकोली यांसारख्या शिजायला जास्त वेळ लागणाऱ्या भाज्यांपासून सुरुवात करून नंतर हळूहळू मशरूमसारख्या लवकर शिजणाऱ्या भाज्या घालाव्यात.
टोफू, चिकन किंवा कोळंबी घालणार असाल तर भाज्या शिजवून झाल्यानंतर घालावे. चवीनुसार सोया सॉस, मीठ आणि मिरपूड घालून परतावे. सोया सॉस जास्त घालू नये. कारण त्यामुळे डिश खूप खारट होऊ शकते. सर्व एकजीव करून आणखी एक-दोन मिनिटे परतावे. सर्व शिजल्यानंतर ही भाजी शिजवलेल्या भातावर किंवा नूडलवर सर्व्ह करा.
टीप – या डिशमध्ये अनेक प्रयोग करता येतात. आवडीच्या कुठल्याही भाज्या घालता येतात, तसेच क्रंचसाठी नट किंवा बिया घालू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.