आजकालच्या मुलांमध्ये उंची कमी असणे ही सामान्य बाब झालीय. कारण, काहींना अनुवांशिकरित्या या समस्येला सामोरे जावे लागते. तर, काहींची नैसर्गिकरित्या उंची कमी असते. अशा मुलांना अनेक टोमणे खावे लागतात. पाहुण्यांमध्येही मुलांची उंची कमी असल्याची चर्चा होते.
मुलांची उंची वाढण्यावर अनेक गोष्टींचे उपाय निघाले आहेत. त्यावर औषधेही तयार झाली आहेत. अशी औषधं घेऊन उंची वाढवता येते पण त्याचे काही साईड इफेक्टही होऊ शकतात. जर तुम्हालाही मुलांच्या कमी उंचीचे टेन्शन येत असेल तर तुम्ही या काही सोप्या गोष्टी करून मुलांची उंची वाढवू शकता. (Child Hight Increase Exercise)
पोषण आणि व्यायाम यांचाही उंचीवर परिणाम होतो. उंची वाढवण्यात पवित्रा आणि शारीरिक हालचाली महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. किशोर वयानंतर मुलांची उंची वाढत नाही, असे म्हटले जाते. पण यात तथ्य नाही. मुलांकडून काही व्यायाम करून घेतले, त्यांना पोषणयुक्त आहार दिला तर नक्कीच त्यांची उंची वाढू शकते.
आम्ही तुम्हाला ६ ऍक्टिव्हीटी सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलाची उंची वाढण्यास मदत होऊ शकते. यामुळे तुमच्या मुलाची मानसिक शक्ती देखील मजबूत होईल आणि मुलाचे शरीर लवचिक राहील. चला तर मग आपण कशाची वाट पाहत आहात ते जाणून घेऊया.
सायकल चालवणे लहानपणापासून तुम्ही ऐकत आला असाल की सायकल चालवल्याने उंची वाढते. हेच तुम्ही तुमच्या मुलांनाही सांगा. कारण, सायकल चालवल्याने मुलांची शारीरिक वाढ होते. त्यांचे स्नायू मजबूत होतात आणि त्यांची उंचीही वाढते.
आजकालची मुलं मैदानात कमी अन् मोबाईलवर जास्त खेळतात. पण मुलांना मैदानात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल असे खेळ खेळायला लावा. यामुळे मुलांची उंची वाढू शकते. जर तुमच्या मुलाने ते रोज खेळले तर त्याची उंची चांगली असू शकते.
शरीराला स्ट्रेच करण्यासाठी जीममध्ये हँगिंग एक्सरसाइज नक्कीच केली जाते. या व्यायामाचा परिणाम मुलांच्या उंचीवर उत्तमरित्या पडतो. कारण, यामुळे मुलांचे शरीर स्ट्रेच होते. आणि त्यामुळे मुलाची उंचीही वाढू शकते. यामुळे मुलाच्या शरीरही फिट राहते. मुलांना एक वेगळा उत्साह मिळतो अन् त्यांचे आरोग्यही सुधारते.
तुम्ही पालक म्हणून मुलांच्या आरोग्यासाठी जागरूक असाल. तर त्यांना जॉगिंगला मुद्दाम घेऊन जा. आपल्या मुलाच्या शारीरिक आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. यामुळे मुलाची उंचीही सुधारते. पायाच्या बोटाला स्पर्श केल्याने तुमच्या मुलाची उंची देखील सुधारू शकते. यामुळे शरीरात लवचिकताही येते.
लहानपणी शाळेत खेळाच्या तासाला दोरीच्या उड्यांची स्पर्धा भरायची. पण आजकालच्या मुलांना याची माहिती नाही. तुम्ही मुलांकडून हा व्यायाम घेतला तर सर्वाधिक चांगला परिणाम तुम्हाला दिसेल. त्यामुळे, मुलांना दोरीवरच्या उड्या मारायला सांगा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.