संकल्प संपूर्ण स्वास्थ्य, अंतर्गत ‘स्क्रीन टू ग्रीन’

Healthy Tips: मुलांनी दिवसभरात पाच वेळा आहार घ्यावा. यामध्ये सकाळी नाष्टा, त्यानंतर अल्प आहार, दुपारचे जेवण, अल्प आहार व रात्रीचे जेवण.
Healthy Tips
Healthy TipsSakal
Updated on

Healthy Tips: विद्यार्थ्यांसाठी संतुलित आहार, स्क्रीन वेळ, झोपेचे नियोजन कसे असावे, याबाबत भारतीय बालरोग अकादमी व शिक्षण विभाग यांच्यातर्फे संकल्प संपूर्ण स्वास्थ्य कार्यक्रम नुकताच शहरातील १० शाळांमध्ये राबविण्यात आला.

यासाठी शहरातील नामांकित दहा बालरोगतज्ज्ञांनी पुढाकार घेतला होता. शहरातील दहा शाळांमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा आहार, विहार, स्क्रीन टाइम, जंक फूड्स, दिनचर्येविषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

असा असावा मुलांचा संतुलित आहार

मुलांनी दिवसभरात पाच वेळा आहार घ्यावा. यामध्ये सकाळी नाष्टा, त्यानंतर अल्प आहार, दुपारचे जेवण, अल्प आहार व रात्रीचे जेवण.

आहारातील घटक

तृणधान्य, मिलेट्स, डाळी, मांसाहार, फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ.

यातून मिळतात प्रथिने

डाळी, मोड आलेले कडधान्य, सोयाबीन, शेंगदाणे, सुकामेवा, चिकन, मासे, अंडी, तर भाज्या व फळे यातून तंतुमय पदार्थ, लोह, जीवनसत्त्व व खनिज पदार्थ मिळतात. वेगवेगळ्या भाज्या, फळांतून वेगवेगळी जीवनसत्वे मिळतात. ऋतुमानानुसार दररोज पाच वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या व फळांचे सेवन करावे.

Healthy Tips
Healthy Tips: 'किवी’ खाल्यास 'हे' आजार राहतील दूर, वाचा आहारतज्ज्ञांचे मत

आरोग्यदायी पेय

ताक, कैरीचे पन्हे, लस्सी, लिंबू सरबत, नारळपाणी, (बाजारातील आरोग्यास हानीकराक पेय, शीतपेय, एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करू नये.)

हे लक्षात ठेवा

जेवण कधीही चुकवू नका. विशेषतः सकाळचा नाष्टा उशिरा होत असेल तर किमान एखादे फळ खावे.

जेवताना टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप पाहू नये

दिवसात वेगवेगळ्या पाच रंगाची फळे, भाज्यांचे सेवन करावे.

फळे खावीत, नुसताच फळांचा रस पिऊ नये.

शक्यतो घरी तयार केलेले अन्न खावे, त्यात अर्धे ताट फळांनी भरलेले असावे.

जंक फूड शरीराला घातक

जंक फूडमध्ये उष्मांक, साखर, मीठ, प्रिझर्व्हेटिव्स, रंग, वासवर्धक रसायनांचा वापर जास्त असतो. तर शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिजे, फायबर नाममात्र असतात. त्यामुळे जंक फूडमुळे अशक्तपणा, स्थूलता यांसारखे अनेक शारीरिक, मानसिक आजार होतात. अभ्यास, खेळामध्ये देखील मुलांना उत्साह येत नाही.

शरीर तंदुरुस्तीसाठी

सशक्त निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा.

किमान एक तास मैदानी खेळ खेळा.

जास्त वेळ टीव्ही, मोबाइल, बघणे टाळा.

झोपेशिवाय जास्त वेळ बसणे, लोळणे टाळावे.

मुलांनी शक्यतो दहा वाजेच्या आत झोपावे.

झोपण्यापूर्वी चॉकलेट, चहा, कॉफी, गोड पेय टाळावे.

चांगली झोप येण्यासाठी वडिलधाऱ्यांकडून गोष्टी ऐका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.