World Chocolate Day 2024 : पहिलं चॉकलेट कधी तयार झालं ? जाणून घ्या 4 हजार वर्षांपूर्वीचा जुना इतिहास

Chocolate Day History: या दिवशी लव बर्ड्स एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात आणि त्याचसोबत चॉकलेट डेच्या शुभेच्छा ही देतात
Chocolate Day History
Chocolate Day Historyesakal
Updated on

Chocolate history: भारत हा सण आणि उत्सवांचा देश आहे. आपल्या देशात जितके सण आहेत तितके कोणत्या दुसऱ्या देशात नाही. सर्व धर्म आणि संप्रदायाचे सण, दिवस आपण उत्साहात  साजरे करतो. आज चॉकलेट डे आहे.

तस तर व्हॅलेंटाईन वीकमध्येही एक चॉकलेट डे असतो. पण खरा चॉकलेट डे आज म्हणजे 7 जुलै रोजी असतो. चॉकलेट डे दिवशी लव बर्ड्स एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात. आजच्या लेखात आपणचॉकलेटचा इतिहास पाहणार आहोत.

Chocolate Day History
Assembly Session: चंद्रकांत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! दादांनी चॉकलेट देऊन भरवला पेढा; पाहा VIDEO

चॉकलेटचा इतिहास 4 हजार वर्ष जुना आहे .चॉकलेटचा इतिहास सुमारे 4000 वर्षांचा आहे. चॉकलेट कोकोपासून बनवले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा शोध प्रथम अमेरिकेत लागला कारण कोकोचे झाड पहिल्यांदा अमेरिकेच्या जंगलात सापडले. तथापि आजच्या जगात आफ्रिका हा जगातील कोकोचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. जगातील 70 टक्के कोकोचा पुरवठा एकटा आफ्रिकेतून होतो. चॉकलेटच्या शोधाची कहाणीही खूप रंजक आहे.

Chocolate Day History
Assembly Session: चंद्रकांत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! दादांनी चॉकलेट देऊन भरवला पेढा; पाहा VIDEO

1528 मध्ये स्पेनने मेक्सिकोला जोडले. यासोबत तिथल्या राजाने मेक्सिकोहून स्पेनमध्ये कोकोच्या बिया आणि साहित्यही आणले. स्पेनमधील लोकांना कोको इतका आवडला की ते तिथल्या लोकांचे आवडते पेय बनले.

अमेरिकेच्या भूमीवर चॉकलेटची सुरुवात झाली सुरुवातीला चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारे बनवले जात असे. वेळोवेळी ते बनवण्याच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाले आहेत आणि आज विकले जाणारे चॉकलेट चवीला खूप चांगले आहे.

असे म्हटले जाते की चॉकलेट प्रथम अमेरिकेत बनवले गेले होते परंतु सुरुवातीच्या काळात त्याच्या चवीत थोडा तिखटपणा होता. वास्तविक अमेरिकन लोक ते तयार करण्यासाठी कोकोच्या बियांसोबत काही मसाले आणि मिरच्या बारीक करत असत, ज्यामुळे त्याची चव तिखट होते.

Chocolate Day History
Punjab: चॉकलेट खाल्ल्यानंतर १८ महिन्यांच्या चिमुकलीला रक्ताच्या उलट्या, तपासात धक्कादायक खुलासा

आज आपण जे चॉकलेट खातो, त्याची सुरुवात 1850 मध्ये झाली. जोसेफ फ्राई या इंग्रज व्यापाऱ्याने कोकोची पावडर आणि साखरेसोबत गरम पाण्याऐवजी कोकोपासून तयार करण्यात आलेल्या बटरचा मोठ्याप्रमाणात वापर केला.

त्यामुले सॉलिड चॉकलेटचा शोध लागला. तर 1875 मध्ये डॅनियल पीटर आणि हेनरी नेसल यांनी दूध गोठवून चॉकलेट बार तयार केला. त्यानंतर पुन्हा 1879 मध्ये स्वित्झर्लंडच्या रुडॉल्फ लिंडटेने कॉन्च नावाच्या मशीनचा शोध लावला, त्यामुळे चॉकलेट मॅन्युफॅक्चरींगची सर्व सिस्टिम बदलली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.