उन्हाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी कसा असावा ऑफिस लुक

रोज ऑफिसला वेगवेगळ्या कपड्यांमध्ये जावंसं वाटतं आणि चांगल्या कपड्यांबरोबर आत्मविश्वासही येतो.
Summer Fashion Tips
Summer Fashion Tipsesakal
Updated on
Summary

रोज ऑफिसला वेगवेगळ्या कपड्यांमध्ये जावंसं वाटतं आणि चांगल्या कपड्यांबरोबर आत्मविश्वासही येतो.

उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात नेमकं कोणत्या प्रकारचे कपडे घालावे हे समजत नाही, पण ऑफिसला (Office) जायचं असेल तर आपल्यात अडचणी आणखी वाढतात. दररोज स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसावं, यासाठी नेमकं काय घालावं हे समजत नाही. रोज ऑफिसला वेगवेगळ्या कपड्यांमध्ये जावंसं वाटतं आणि चांगल्या कपड्यांबरोबर आत्मविश्वासही येतो. आता उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात जास्त गरम वाटू नये म्हणून कपडे जास्त सैल वापरले जातात. फॅशन (Fashion) स्टाइलही चांगली असावी आणि उन्हाळ्यासाठीही कम्फर्टेबल असावी, यासाठी उन्हाळ्यात नेमकं कोणते कपडे घालावे, याबद्दल जाणून घेऊयात.

Summer Fashion Tips
मोकळ्या केसांमध्ये स्टायलिश दिसायचंय! या Hair Accessoriesची घ्या मदत

कोणते कपडे निवडावे - रोज ऑफिसला जायचं असेल तर कॉटन, लीनन आणि खादीचे कपडे घालणे आरामदायी वाटेल आणि हे कपडे उन्हात येणारा घाम शोषून घेतात, साहजिकच ऑफीसमध्ये स्वेटिंग अवॉइड केले पाहिजे. हे लक्षात घेऊन खादीचा कुर्ता किंवा कॉटन लाँग टॉप असलेली जीन्स घालू शकता.

भारतीयांमध्ये काय निवडावं - उन्हाळ्याच्या दिवसात ऑफीस लूकसाठी काही इंडयन वेयर वापरायचं असेल तर पेस्टल कलरचे सूट्स घ्या. हवं असेल तर पोल्का डॉट किंवा ब्लॉक प्रिंटचा लाँग कुर्ता घालू शकता. यामुळे तुम्हाला एक फॉर्मल लूक मिळेल. तसंच आवडत असेल तर उन्हाळ्यात हॅण्डलूम प्रिंट्सही फॉर्मल लूक देतात. त्याचबरोबर साड्यांबद्दल बोलायचं झालं तर कॉटनच्या साड्या उन्हाळ्यात उत्तम असतात.

Summer Fashion Tips
Fashion Tips : स्टायलिश दिसायला आवडतं? मग हे आऊटफिट ट्राय करा

फिटिंग्जमध्ये काय निवडावं - ऑफीसला जाण्यासाठी वापरत असलेले कपडे जास्त सैल किंवा जास्त फिटिंग होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण फिटिंग कपडे घालता तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटेल. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या शर्टसोबत काळ्या रंगाची पँट वापरु शकता किंवा पांढऱ्या शर्टसोबत शूजही घालू शकता.

शूजमध्ये काय निवडावे - उन्हाळ्याच्या दिवसात चांगल्या कपड्यांसोबत आरामदायक शूज किंवा चप्पल घालणे देखील महत्वाचे आहे. जीन्स घातली तर त्यावर कॉटन शूज किंवा बेली घालू शकता.

Summer Fashion Tips
स्टायलिश दिसण्यासाठी चार अ‍ॅक्सेसरीज करा कॅरी! ग्लॅमरस दिसेल लूक

लूक कसा निवडावा - जर तुम्ही बिजनेस वुमन असाल तर तुम्हाला येणाऱ्या-दि-मीटिंग अ ॅटएन्डचं काम करावं लागतं आणि बहुतेक कॉर्पोरेट हाऊसेस आता फॉर्मल ड्रेस कोड फॉलो करू शकतात, त्यामुळे तुम्ही स्वत:साठी समर ब्लेजर खरेदी करू शकता, हा लूक फॉर्मल आहे आणि घालायला कम्फर्टेबल वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.