Cleaning Tips: फ्रिजच्या खालची जागा झटक्यात होईल स्वच्छ, फक्त वापरा 'या' टिप्स

Cleaning Tips: फ्रिजच्या खालची फरशी स्वच्छ करण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. पण यासाठी तुम्ही पुढील सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.
Cleaning Tips
Cleaning Tips Sakal
Updated on

Cleaning Tips For Freezer : घरातील अनेक भागांची स्वच्छता करतान हात पोहोचू शकत नाहीत. जसे की फ्रिजखालची फरशी स्वच्छ करणे अवघड आहे. कारण तिथला जागा कमी असते. फ्रिजखालील फरशी जास्त खराब होऊ शकते.

धुळीच्या कणांमुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घाण साचते, जी वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. फ्रिजच्या खालीलची फरशी स्वच्छ करणे कठीण असले तरी पुढील टिप्स वापरून स्वच्छ करू शकता.

लांब झाडू वापरा

फ्रीज थोडा वर उचला आणि सर्वात पहिले त्याच्या खालून घाण काढून टाका. यासाठी तुम्ही लांब झाडू वापरू शकता. जर येथे काही चिकट घाण असेल तर ती ओल्या कापडाने घासून पुसून टाका.

फ्रिज दुसऱ्या ठिकाणी ठेवावे

शक्य असेल तर फ्रीज दुसऱ्या जागी ठेवा आणि त्याखालीलची फरशी स्वच्छ करा. फ्रिज खूप जड असेल तर तुम्ही रोलर्स किंवा स्लेज वापरून ते ठिकाणाहून हलवू शकता.

Cleaning Tips
Cleaning Tips: घरातील दारावर पडलेले रंगाचे डाग झटक्यात होतील दूर, फक्त करा 'हे' काम

व्हॅक्यूम क्लिनरचा वापर

जर तुम्हाला फ्रिजच्या खालील फरशीची स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता. यामुळे धुळ निघूण जाईल. फ्रीजखाली जागा कमी असल्याने.लांब, पातळ नोझलसह व्हॅक्यूम क्लिनर वापरणे आपल्यासाठी चांगले असू शकते.

फरशी कशी स्वच्छ करावी?

फ्रिजच्या खालची फरशी स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी आणि सौम्य डिटर्जंटचे मिश्रण वापरू शकता. यासाठी तुम्ही स्टिक मॉप किंवा स्पंज वापरू शकता. जर जमिनीवर ग्रीस किंवा कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर तुम्ही घासून स्वच्छ करू शकता. नंतर स्वच्छ पाण्याने फरशी स्वच्छ धुवावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.