Cleaning Tips : सणाच्या आधी कळकटलेले स्वीचबोर्ड असे करा चकचकीत, दिसतील एकदम नव्यासारखे!  

स्वीचबोर्ड काळे होऊ नये यासाठी काय करावं?
Cleaning Tips
Cleaning Tipsesakal
Updated on

Cleaning Tips :  सण-समारंभाआधी घर स्वच्छ केले जाते. उद्याच गणपतीबाप्पाचे आगमन होणार आहे, त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही घर चकचकीत करणार असाल. तर, एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगतो. 

गणपतीसाठी डेकोरेशन  जसे महत्त्वाचे आहे, तसेच घरी येणाऱ्या पाहुण्याप्रमाणेच आपण बाप्पाचे स्वागत आनंदात करतो. मग अशावेळी बाप्पाला आपल्या धुळीने माखलेल्या घरात बसवतो का आपण, नाही ना. घर तर आपण चमकवतो पण स्विच बोर्ड तसेच घाणेरडे असतात.

जर तुम्हालाही घाणेरड्या स्विच बोर्डचा त्रास होत असेल, लाखो प्रयत्नांनंतरही तुमच्या स्वीच बोर्डवरील काळे-पिवळे डाग जात नसतील. तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण आता तुम्ही एका गोष्टीने हे करू शकता. (How do you clean dirty electric switch boards) 

Cleaning Tips
Laptop Cleaning Tips : किबोर्ड कसा साफ करावा? हे उपाय नक्की ट्राय करा!

नेल पेंट रिमूव्हरने स्विच बोर्ड स्वच्छ करा

नेल पेंट रिमूव्हरने तुम्ही स्विच बोर्ड अगदी सहज स्वच्छ करू शकता. होय, नेल पेटचा वापर फक्त नेलपॉलिश काढण्यासाठी केला जात नाही तर त्याच्या मदतीने तुम्ही घरातील गलिच्छ स्विच बोर्ड साफ करू शकता.

अनेकदा ओलावा, तेल किंवा घाणेरड्या हातांनी स्पर्श केल्यामुळे बोर्डवर डाग जमा होतात. अशा परिस्थितीत नेल पेंट रिमूव्हर तुमची मदत करू शकतो. नेल पेंट रिमूव्हर स्विचबोर्डवरील सर्वात जुने डाग देखील काढू शकतो  .

नेलपेंट रिमूव्हरने स्विच बोर्ड कसे स्वच्छ करावे

  • स्विच बोर्ड साफ करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही . आपल्याला फक्त या सोप्या गोष्टी कराव्या लागतील.

  • सर्वात आधी कॉटन बॉलवर नेल पेंट रिमूव्हर लावा.

  • आता ते स्वीच बोर्डवर ठेवा आणि घासा.

  • काही काळानंतर तुम्हाला डाग आणि डाग कमी दिसतील.

  • यानंतर, कापूस पुन्हा रिमूव्हरमध्ये बुडवा.

  • ते पुन्हा स्विच बोर्डमध्ये लावा आणि काही वेळ ते सुकूदेत.

  • यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ करा. (Cleaning Tips)

Cleaning Tips
Clean Air Survey : स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिकचा आलेख चढता! देशपातळीवर 21 वा क्रमांक

स्विच बोर्ड साफ करताना ही खबरदारी घ्या

  1. स्विच बोर्ड साफ करण्यासाठी, प्रथम मुख्य लाईटचे कनेक्शन बंद करा.

  2. यानंतरच ते नेल पेंट रिमूव्हर किंवा इतर कशानेही स्वच्छ करा.

  3. स्विच बोर्ड साफ करण्यासाठी कधीही पाणी किंवा कोणतेही ओले कापड वापरू नका.

  4. स्वीच बोर्ड पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच मुख्य स्विच चालू करा.

स्वीचबोर्ड काळे होऊ नये यासाठी काय करावं?

स्वीच बोर्डला हात लावताना हात स्वच्छ आहेत याची काळजी घ्या. ज्यामुळे स्वीचबोर्ड खराब होणार नाही.

केवळ हातानेच बोर्ड खराब होतो असे नाही. तर, घरात आलेल्या धुळीमुळे, पदार्थ बनवताना होणाऱ्या गरम वाफेमुळे देखील बोर्ड खराब होतात. त्यामुळे तुम्ही वरचेवर बोर्ड कापडाने पुसून घ्या. ज्यामुळे बोर्ड खराब होणार नाही.   

Cleaning Tips
Mobile Cover Cleaning: नवीन मोबाईल कव्हरसाठी खर्च कशाला? या ट्रिक्सने जुनं पिवळं पडलेलं कव्हर होईल नव्यासारखं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()